कुणामुळे झाले अमरावतीत नागरिक हैराण, काय आहे कारण?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या घटनांना अद्याप ब्रेक बसला नाही. शहरात चार, तर ग्रामीणमध्ये एक, असे दुचाकीचोरीचे एकूण पाच गुन्हे दाखल झाले.


भातकुली तहसील कार्यालयामध्ये आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आनंद भीमराव डहाके (वय 51) गेले होते. यांनी त्यांची दुचाकी तहसील कार्यालय परिसरात पार्क केली. काम आटोपल्यानंतर परत आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. तर दुसरी घटना वडाळी येथील परिहारपुरा नजीकच्या पुलाजवळ घडली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुधीर विष्णुपंत वर्धे (वय 45) यांनी त्यांची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे पुलाजवळ उभी केली. रात्री अकराच्या सुमरास ते पेट्रोल घेऊन दुचाकी आणण्यास गेले असता दुचाकी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दोघांच्याही तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तिसरी घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत टांक चेंबरजवळ घडली. राजेश श्रीकृष्ण सुने (वय 28) यांनी त्यांची दुचाकी उड्डाणपुलाखाली उभी केली असता थोड्या वेळाने परत येईपर्यंत ती दुचाकी चोरीस गेली होती. सुने यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दुचाकी चोरीची चौथी घटना हातूर्णा पुनर्वसन परिसरात घडली. गजानन महादेव राऊत (वय 55) यांनी घरासमोर उभी केलेली एमएच 27 डब्ल्यू. 4240 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली. राऊत यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ग्रामीण भागात शिरसगावकसबा ठाण्याच्या हद्दीत सर्फापूर येथून हरीश महादेव घुलक्षे (वय 57) यांची एमएच 27 बीजी 1773 क्रमांकाची दुचाकी घरासमोरून चोरीस गेली. शिरसगाकसबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com