ऐन सणासुदीत बिलासपूर इंटरसिटी आठ दिवस रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर व रायपूर विभागात सुरू असलेल्या विविध कामांमुळे आगामी काही दिवस रेल्वे वाहतूक प्रभावित राहणार आहे. बिलासपूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस आठ दिवस रद्द राहणार असून, अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. ऐन सणासुदीत गाड्या प्रभावित राहणार असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. 

12856 इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि 12855 बिलासपूर-इतवारी एक्‍स्प्रेस 14 ते 20 ऑक्‍टोबरदरम्यान रद्द राहणार आहे. 58111 टाटा-इतवारी पॅसेंजर 14 ते 20 ऑक्‍टोबरदरम्यान बिलासपूर-इतवारी दरम्यान रद्द राहील. 58112 इतवारी- टाटा पॅसेंजर 13 ते 19 ऑक्‍टोबर दरम्यान इतवारी ते बिलासपूर दरम्यान रद्द राहील. सोबतच 58112 इतवारी- टाटा पॅसेंजर 18 ते 25 ऑक्‍टोबरदरम्यान इतवारी ते झारसुगुडा दरम्यान रद्द राहील. 58117 झारसुगुडा-गोंदिया पॅसेंजर 14 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान बिलासपूर ते गोंदिया दरम्यान रद्द राहील. तसेच 58118 गोंदिया-झारसुगुडा पॅसेंजर 14 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान गोंदिया- बिलासपूर दरम्यान रद्द राहील. 15232 गोंदिया- बरौनी एक्‍स्प्रेस 14 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान गोंदिया ते उसलापूर दरम्यान रद्द रहील आणि दुसऱ्या दिवशी उसलापूर येथूनच परतीच्या प्रवासाला निघेल. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bilaspur intercity cancel