जैवविविधता टिकवा मानव वाचवा

जैवविविधता टिकवा मानव वाचवा

चिमूर : पृथ्वीवरील जिवन श्रृखला सुयोग्य स्थीतीत चालावी या करीता पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक जिव, जंतु, पक्षी, प्राणी आणी मानव यांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. या जिवन श्रृंखलेतिल एक साखळी जरी कमजोर झाल्यास त्याचा परीणामा सगळ्यावर पडतो. त्यामुळे जंगल, शेत, गाव शिवार येथील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन भोपाळ येथील बॉर्न टु राईड क्लबचे 25 सदस्यांनी जैवविविधता टिकवा मानव वाचवा हा संदेश घेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पला भेट दिली.

वन्यजीव संवर्धन व संरक्षण, जैवविविधता टीकविणे तसेच सुरक्षीत दुचाकी सवारी या विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भोपाळ मधील 200 बुलेट बाईक धारकांनी बॉर्न टु राईड क्लब स्थापन केली. या नोंदणीकृत क्लब द्वारे प्रत्येक महिन्यामध्ये दोन ड्राईव्ह आयोजीत करण्यात येते. ज्यामध्ये एक कमी पल्याची व दुसरी लांब पल्याची असते. या क्लब द्वारा संरक्षीत वन क्षेत्र, धबधबे व जवळील गावे येथे वन्यजीव संवर्धन, जैव विविधतेचे महत्व इत्यादी विषयी जाणीव जागृती करण्या करीता मोहीम राबविण्यात येते. हि नैसर्गीक संपदा पीढी दर पीढी कशी संरक्षीत राहील व याचा लाभ येणाऱ्या पिढीला व्हायला पाहीजे असा संदेश दिला जातो.

बॉर्न टु राईड क्लबचे 25 रायडर्स 28 सप्टेबंरला पहाटेच भोपाळ मधून निघाले. दररोज शंभर किलोमिटर या प्रमाणे प्रत्येक टप्यावर संदेश देण्याचे ते काम करतात. ते सोमवारी सांयकाळी 8 वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याघ्र प्रकल्प असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मधील जैवविविधतेचे दर्शन व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्या करीता 460 किमी अंतर पार करून व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश द्वार कोलारा गेटला आले. प्रकल्पा लगत असलेल्या सेव्हन टायगर्स या रिसोर्ट मध्ये दोन दिवसाचा मुक्काम केला. दोन दिवसाच्या जंगल सफारी ने सर्व सदस्यांना जैवविविधतेचे दर्शन झाले. हि संम्पदा टिकविण्या करीता विश्वातिल प्रत्येक नागरीकांनी खारीचा वाटा उचलने गरजेचे असून हाच उद्देश घेऊन आम्ही फीरत असतो अशी माहीती क्लबचे ग्रृप लिडर जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

रस्त्यावरून वाहने चालवित असता प्रथमतः स्वतःच्या सुरक्षे करीता हेल्मेट, बुट आणी लांब पल्ल्याची रपेट असताना जमल्यास पायास पॅड बांधावा. वाहतुकीचे सर्व नियम काटेकोर पणे पाळावे ज्यामुळे स्वतः सोबतच इतरांची सुद्धा सुरक्षा होते. अशा प्रकारे प्रत्येकाने काळजी व खबरदारी घेतल्यास रस्ते अपघात कमी होतील. याची जनजागृती क्लब द्वारे करण्यात येते.

जिवन श्रृंखलेत प्रत्येक जिव, पक्षी, प्राणी, वनस्पती याला अनन्य साधारण महत्व आहे. याचे संवर्धन व संरक्षण करणे प्रत्येक नागरीकांचे तसेच या क्षेत्रातील ग्रामस्थांचे आद्य कर्तव्य आहे. ज्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढयांना या निसर्ग संपदेचा लाभ मिळेल. हाच संदेश घेऊन आम्ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलो आहोत. 
- डॉ. सुरजितसिंग बॉर्न टु राईड क्लब मेंबर, भोपाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com