बायोमेट्रिकनुसार तपासणार हजेरी - डॉ. चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्याने मेडिकल, मेयोच्या निवासी डॉक्‍टरांमध्ये असंतोष आहे. 8 तासांचे काम ठरवून दिल्यास बायोमेट्रिकवर अंगठा लावणार यावर डॉक्‍टर अडून आहेत. परंतु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे नुकतेच निवासी डॉक्‍टरांची बायोमेट्रिकवरील हजेरी तपासली जाईल. यानंतरच परीक्षेला बसू देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी व्यक्त केले. 

नागपुरात उद्यापासून स्पंदन महोत्सव होत आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय वैद्यक परिषदेचे आदेश आहेत. याशिवाय लोढा समितीच्या शिफारशीत बायोमेट्रिक हजेरीचा उल्लेख आहे. यामुळे बायोमेट्रिक हजेरी सक्तीचा निर्णय घेतला. राज्यातील सर्वच शासकीय, खासगी महाविद्यालयात नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, मेयो, मेडिकलमधील डॉक्‍टरांचा त्यास विरोध आहे. निवासी डॉक्‍टरांनी बायोमेट्रिकचा निर्णय न मानल्यास त्यांना प्रात्यक्षिक तसेच तत्सम परीक्षांना मुकावे लागेल, असे संकेतही देण्यात आले. संबंधित विषयाचे विभागप्रमुख यांच्यामार्फत बायोमेट्रिकचा अहवाल मागविण्यात येणार आहे. 

राज्यात एमडीच्या जागा वाढणार 
वैद्यकीय व्यवसायातील क्‍लिनिकल विभागात एका प्राध्यापकाला तीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मिळणार असल्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) जागा वाढण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यात 600 ते 1,000 पर्यंत जागा वाढतील, असा अंदाज प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी व्यक्त केला. 

विद्यापीठ ऑनलाइनच्या दिशेने 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीला दुजोरा देत विद्यापीठ ऑनलाइनच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. परीक्षा फॉर्म भरण्यापासून ओळखपत्र, पुनर्मूल्यांकनापर्यंत ऑनलाइन व्यवहार झाले आहेत. 

गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचारासाठी मेडिकल, मेयो तसेच इतरही वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्‍टर उपलब्ध नसतात. यातून हाणामारीच्या घटना घडतात. विशेष म्हणजे अनेकदा सामूहिक बंक असते. लोढा समितीने शिफारस केल्याने बायोमेट्रिक प्रणालीला मार्डचा विरोध असू नये. 
-डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 

Web Title: biometric attendance