सर्वाधिक अंतर गाठणारा अमूर पक्षी आढळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

यवतमाळ : ज्याच्या नावे दरवर्षी सर्वाधिक म्हणजे 22 हजार किलोमीटर अंतर गाठण्याची नोंद आहे. शास्त्रीय अभ्यासादरम्यान हे सिद्ध झाले, असा शिकारी पक्षी अमूर ससाणा (फालको अमूरॅनसिस) यवतमाळजवळील बोरगाव धरणावर रविवारी (ता. 2) सकाळी निरीक्षणादरम्यान प्रा. डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांना आढळून आला.

प्रा. जोशी यांच्या मते यवतमाळ शहराजवळच्या माळरानांवर आणि पठारावर मोठ्या संख्येने शिकारीवर्गातील प्रवासी पक्षी येत असतात. पण, अमूर ससाणाची नोंद विशेष आहे. मूळचा मंगोलियाचा असणारा हा ससाणा हिवाळ्यात दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित होतो व स्थलांतरादरम्यान तो भारत, श्रीलंका, चीन आदी आशियाई देशावरून प्रवास करतो. त्यामुळे मार्गस्थ असताना कुठे काही क्षणासाठी विसावा घेतो. तोच क्षण बोरगाव प्रकल्पावर अमूरने रविवारी घेतला. दहा वर्षांच्या पक्षी निरीक्षणादरम्यान यवतमाळात या पक्ष्याची पहिलीच नोंद असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. डॉ. दाभेरे यांच्या मते रविवारी सकाळी सात वाजतादरम्यान दोन पक्ष्यांची नोंद आम्ही घेतली. ऑगस्टमध्ये मिळालेल्या स्टार्क बितकिंगफिशर नंतरची ही महत्त्वाची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: bird news