जेसीआयने दिला पक्षी "बचाव'चा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

गोंदिया - उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. तथापि, पक्ष्यांचा मृत्यू टाळता यावा, याकरिता जेसीआय राइस सिटी गोंदियाने पुढाकार घेतला आहे. येथील सुभाष बगीच्यात कृत्रिम पाणवठे तयार करून एकप्रकारे पक्षी "बचाव'चा संदेश दिला आहे. एवढेच नव्हे, तर मार्निंग वॉककरिता येणाऱ्या नागरिकांनाही मातीची भांडी निःशुल्क वितरित केली. जेसीआय गोंदिया राइस सिटीचे अध्यक्ष ओमप्रकाश सपाटे व समूहाने हा उपक्रम सुरू केला. 

सद्यस्थितीत तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक पक्षी मृत्यूच्या दाढेत आहेत. पाणी न मिळाल्याने ते मृत्युमुखी पडतात. हे बघून शहरातील सुभाष बागेमध्ये मातीची भांडी झाडांना व इतर ठिकाणी टांगून त्यांच्यात पाणी घालून पक्ष्यांकरिता सोय केली. बागेत फिरायला आलेल्यांनाही मातीची भांडी देऊन आपल्या घरासमोर ही भांडी ठेवण्याचे आवाहन केले. प्रथमच पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत पहिल्या दिवशी 300 मातीच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले. सकाळी बागेमध्ये मॉर्निंग वॉक करण्याकरिता येणाऱ्या लोकांना या मातीच्या भांड्यात पाणी टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 1,100 मातीची भांडी ही पक्ष्यांकरिता बागेसह शहरातील विविध शासकीय कार्यालयात लावण्यात येणार आहे. या उपक्रमात नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, सौरभ अग्रवाल, मंजू कटरे, सेजल पटेल, स्वाती चौहान, मधुलिका नागपुरे, सौरभ जैन, अंकुश डोडानी, कृष्णा शेंडे, नितीन मेश्राम, विशाल ठाकूर, नीलेश फुलबांधे, राम ललवाणी, शैलेंद्र कावळे, उमंग साहू, प्रणय अग्रवाल, सागर सोनावणे, रेखा केलनका, शाहीन कुरेशी, श्रुती अग्रवाल, दिशा कृष्णानी, अंजली कौशिक, प्रीतिशा केलंका, फरजाना अन्सारी, वाणी लांजेवार, वैशाली भीमटे आदी सहभागी झाले होते. 

Web Title: Bird rescue of the message