जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमले मातृतीर्थ 

गजानन काळुसे
Sunday, 12 January 2020

बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित टप्प्याटप्याने कार्यक्रम होऊ घातले आहे. 

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित टप्प्याटप्याने कार्यक्रम होऊ घातले आहे. 

राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त आज सकाळी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव, वंशज लखोजीराजे जाधव, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले. या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमीची व जिजाऊप्रेमींचा अलोट असा जनसागर पहावयास मिळत आहे. 

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

दरम्यान, उत्सवाच्या पूर्व संध्येलाच दूरवरुन नतमस्तक होण्यासाठी भाविक मातृतिर्थ नगरीत दाखल झाले होते. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांच्या राहण्यासोबतच जेवनाची व्यवस्थाही केली होती. दरम्यान, मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे यंदा छत्रपतीं शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जनमेजयराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ससंदरत्न सुप्रियाताई सुळे यांचासह अनेक राजकीय मंडळीही उपस्थित राहणार आहे. 

हेही वाचा - शिवशंकरभाऊ पाटील...द्रष्टा कर्मयोगी!

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoor

मराठा सेवा संघाच्या वतीने पुरस्काराचे वितरण
मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना देण्यात येणार आहे. तर कोण बनेगा करोडपती विजेत्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील बबिता ताडे यांना मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण व जिजाऊ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा - अकोल्याची मुलगी साकारतेय तानाजी चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Image may contain: 14 people, people smiling, people sitting

खासदार सुप्रियाताई सुळेंनी केले जिजाऊंच्या विशेषांकाचे अवलोकन
माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सावानिमित्त दैनिक सकाळ च्या वर्‍हाड आवृत्तीअंतर्गत दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव विशेष अंकाचे प्रदर्शन करण्यात येते. यंदा मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे या अंकाचे थाटात विमोचन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या विशेष अंकाचे अवलोकन करत कौतुक केले. विशेष अंकाच्या माध्यमातून मातृतिर्थ आणि जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम दैनिक सकाळ सातत्याने करत असून, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, रंजनी राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, मेहबूब शेख आदींची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birth festival of maa jijau in sindkhedraja buldana