वर्धा जिल्ह्यात दोन डोक्‍याच्या बाळाचा जन्म

वर्धा जिल्ह्यात दोन डोक्‍याच्या बाळाचा जन्म

समुद्रपुर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील मनगाव येथील महिलेने दोन डोक्‍याच्या बाळाला जन्म दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

मनगाव येथील शैलेश वाणी यांची पत्नी कल्पना यांना सेवाग्राम रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी गर्भातील बालकाच्या जिवाला धोका असल्याचे सांगून नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कल्पनाला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 7 मे रोजी तिची प्रसूती झाली असता डॉक्‍टरांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. जन्मलेल्या बालकाला दोन डोकी होती.

विशेष म्हणजे, दोन्ही डोक्‍यांना संवेदना होती. दुसऱ्या दिवशी 8 मे रोजी या बालकाचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com