आईचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

वरोरा ( चंद्रपूर) : घराच्या जागा वाटपावरून मुलाने आईवर हल्ला केला. यात आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूप्रकरणात मुलगा दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. हा निर्णय जिल्हा सत्र न्यायाधीश भेंडे यांनी दिला.

वरोरा ( चंद्रपूर) : घराच्या जागा वाटपावरून मुलाने आईवर हल्ला केला. यात आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूप्रकरणात मुलगा दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. हा निर्णय जिल्हा सत्र न्यायाधीश भेंडे यांनी दिला.
भद्रावती तालुक्‍यातील राळेगाव येथील कौशल्याबाई जनार्दन वानखेडे यांना गजानन व प्रकाश अशी दोन मुले, तर मंगला नावाची एक मुलगी आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. मोठा मुलगा गजानन हा लहानापासून पनवेल येथे कामाला होतो. तिथेच त्याने लग्न केले. वर्षातून एक-दोनदा तो गावी येत होता. मधल्या काळात तो पत्नी व मुलीला घेऊन राळेगावला आला होता. घराच्या जागेवरून नेहमीच त्याचे आईशी भांडण होत होते. गजाननला लहान भाऊ प्रकाश नेहमीच घाबरायचा. 11 जून 2017 रोजी सायंकाळच्या सुमारास गजानन आपली मुली आणि आईसोबत जेवण्यासाठी बसले होते. तिथेच गजाननने जागेचा मुद्दा काढला. यावरून दोघांत चांगलाच वाद झाला. रागाच्या भरात गजाननने कौशल्यबाईला मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे गजाननने मुंबई पळून जाण्याच्या तयारीत होता. चुलत मामा अनिल खैरे याने माजरी पोलिसांत तक्रार दाखल केली. माजरी पोलिसांनी गजाननला वरोरा येथे पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायालयात साक्ष घेण्यात आली. आरोपीच्या मुलीने आपल्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश भेंडे यांनी गजानन वानखेडे याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthright to child who murdered mother