बिशप कॉटन स्कूलची  दीड कोटीने फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नागपूर - धरमपेठ येथील बिशप कॉटन स्कूलमधील शासकीय दस्तावेजामध्ये खोडतोड नोकरी मिळवित शाळेतील एक कोटी ४० लाख ७४ हजार रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका, पती आणि मुलीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूर - धरमपेठ येथील बिशप कॉटन स्कूलमधील शासकीय दस्तावेजामध्ये खोडतोड नोकरी मिळवित शाळेतील एक कोटी ४० लाख ७४ हजार रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका, पती आणि मुलीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मंगला सॅम्युअल भालेराव (वय ६२, रा. उमाशंकर अपार्टमेंट, गोकुळपेठ), पती सॅम्युअल भालेराव व मुलगी तनुश्री सॅम्युअल भालेराव अशी आरोपींची नावे आहेत. १ एप्रिल २००५ ते २५ जून २०१५  या कालावधीत मंगला भालेराव या धरमपेठमधील बिशप कॉटन स्कूलच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. यादरम्यान त्यांनी पती सॅम्युअल आणि मुलगी तनुश्री यांच्या संगनमत करून शाळेच्या निधीमध्ये गैरव्यवहार केला. संस्थेद्वारे वारंवार त्यांना शाळेत खर्च केलेल्या निधीचे ऑडिट करण्यासाठी कळविण्यात आले होते. अनेकदा त्यासाठी स्मरणपत्रही  दिले होते. मात्र, याउलट प्रत्येकवेळी त्या विविध कारणे देत, ऑडिट करण्यासाठी नकार देत होत्या. दरम्यान, २०१५ साली त्यांनी शाळेतील शिक्षकांनाही आतमध्ये डांबून  ठेवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात आली होती. 

दरम्यान, त्यानंतरही ऑडिट न केल्याने शाळा व्यवस्थापनाने शाळेचा निधी शालेय उपयोगाकरिता न वापरता स्वतःच्या खासगी फायद्यासाठी वापरले. तसेच शाळेच्या दस्तावेजामध्ये बदल केले करीत स्वतःच्या जन्मदाखल्यात खोडतोड करून शाळा प्रशासनाची फसवणूक करून मुलगी  तनुश्री हिची पात्रता नसतानाही मुख्याध्यापक पदावर रुजू केले होते.  

दमदाटी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
बिशप कॉटनचे मुख्याध्यापक विकास एम. कोल्हेकर यांनी गैरप्रकार उघडकीस आणला होता. मात्र, मंगला आणि तनुश्री यांनी दमदाटी करीत दबाव टाकत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोल्हेकर यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशी अंती मंगला, पती सॅम्युअल आणि मुलगी तनुश्री भालेराव यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

Web Title: Bishop Cotton school a half million fraud