#NagpurWinterSession : शेतकऱ्यांसाठी भाजप पुन्हा आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

दोन दिवस गोंधळ घातल्यानंतर विरोधी पक्ष तिसऱ्या दिवशीही गोंधळ घालून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे भाजपने तिसऱ्या दिवसाची सुरुवात आंदोलनाने केली. कामकाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. 

नागपूर : शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी भाजप आमदारांनी पक्ष कार्यालयापासून विधानसभा पायाऱ्यांपर्यंत क्रांती मोर्चा काढला. तसेच घोषणाही दिल्या. क्रांती मोर्चात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीचे कामकाम याच मुद्‌द्‌यावरून तहकूब करण्यात आले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी परिसरात केली होती. विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आले होते. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली होती. 

क्लिक करा - क्लिक करा - #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

यानंतर मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली होती. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली होती. 

Image may contain: text

अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या दिवशी आंदोलन

दोन दिवस गोंधळ घातल्यानंतर विरोधी पक्ष तिसऱ्या दिवशीही गोंधळ घालून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे भाजपने तिसऱ्या दिवसाची सुरुवात आंदोलनाने केली. कामकाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. 

हेही वाचा - #NagpurWinterSession : बच्चू कडू म्हणाले, सरकाने तरी शेतकऱ्यांना मदत करावी

मंगळवाचे कामकाज दिवसभर तहकूब

शेतकरी मुद्‌द्‌यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सरकारला जाब विचारण्याला सुरुवात केली. यामुळे सभेज चांगलाच गदारोळ सुरू होता तसेच हाणामारीही झाली. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, विरोधक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांनी दोन वेळा कामकाज तहकूब केले होते. यांनतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP again aggressive for farmers