चंद्रपूरची जागा भाजपने राखली; काँग्रेसचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

या निवडणुकीत भाजपला 528, काँग्रेस 491 मते मिळाली. तर, नोटा 1 आणि 36 मते अवैध ठरली. यावरून स्पष्ट होते, की भाजपच्या काही सदस्यांनी काँग्रेसला मतदान केले. 

चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर यांनी विजय मिळविला. तर, काँग्रेसला काही मतांना पराभव स्वीकारावा लागला.

विदर्भात भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणारी ही जागा राखण्यात भाजपला यश आले. मात्र, त्यांना जो अपेक्षित विजय होता, तो मिळू शकला नाही. भाजपच्या रामदास आंबटकर यांना काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांनी चांगली लढत झाली. अखेर भाजपला 37 मतांना विजय मिळविता आला.

या निवडणुकीत भाजपला 528, काँग्रेस 491 मते मिळाली. तर, नोटा 1 आणि 36 मते अवैध ठरली. यावरून स्पष्ट होते, की भाजपच्या काही सदस्यांनी काँग्रेसला मतदान केले. 

Web Title: BJP candidate Ramdad Ambatkar wins in Chandrapur legialative council election