भाजप-कॉंग्रेस आमनेसामने

भाजप-कॉंग्रेस आमनेसामने

खापरखेडा/सावनेर (जि. नागपूर) : सावनेर तालुक्‍यातील सिल्लेवाडा आपली बसच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने गोंधळ उडाला होता. यातच आमदार केदार यांनी भाषणातून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी आमदार केदार उपलब्ध होऊ शकले नाहीत.
गुरुवारी उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात सिल्लेवाड्याच्या सरपंच प्रमिला बागडे यांना डावलण्यात आले. हे कळताच आमदार केदार कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यांनी सरपंचाला कार्यक्रमात का बोलाविले नाही, याचा जाब विचारला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार उपस्थित होते. दोघांचेही समर्थक समोरासमोर आल्याने गोंधळ निर्माण झाला. सरपंचांना डावलण्यात आल्याच्या कारणावरून काही गावकरी व कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उद्‌घाटनासाठी आलेल्या भाजप नेत्यांना आल्या पावलीच परतावे लागले. या घटनेनंतर काही गावकरी व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार केदार आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत गावातील सरपंच बागडे यांच्या हस्ते स्टारबसचे उद्‌घाटन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com