बुटीबोरी अध्यक्षाचा पहिला मान भाजपला

बुटीबोरी ः नगरपरिषदेचे विजयी उमेदवार.
बुटीबोरी ः नगरपरिषदेचे विजयी उमेदवार.

हिंगणा/बुटीबोरी (जि. नागपूर) : स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या बुटीबोरी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बबलू गौतम यांनी पटाकावला. निवडणुकीत युतीचे 16 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फक्त दोन उमेदवार निवडून आले. आघाडीत अध्यक्षपदासह सर्वाधिक जागा मागणाऱ्या कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही हे विशेष.
बबलू गौतम यांनी 3 हजार 861 मतांनी विजय मिळविला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुटीबोरी नगर परिषदेची निवडणूक हिंगणा मतदारसंघासाठी सेमिफायनल मानली जात होती. यात विजय मिळविल्याने भाजपची लाट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवार 23 जून रोजी बुटीबोरी नगर परिषदेसाठी मतदान पार पडले. आज सोमवारी मतमोजणी करण्यात आली. नगराध्यक्षपदी भाजप-सेना युतीचे बबलू मनोरंजन गौतम यांनी 6 हजार 947 मते मिळवीत राष्ट्रवादीचे उमेदवार बल्लू दशरथ श्रीवास यांचा पराभव केला. श्रीवास यांना 3 हजार 86 तर कॉंग्रेसचे जाकीर (बाबू) पठाण यांना 3 हजार 24 मते मिळाली. अपक्ष उमेदवार तुषार डेरकर यांना 1 हजार 269 मते मिळाली.
भाजप-सेना युती नगरसेवकांमध्ये संध्या आंबटकर, विनोद लोहकरे, सानी चव्हाण, रेखा चटप, सारा फराज शेख, विद्या दुधे, अनिस बावला, अर्चना नगराळे, मुन्ना जयस्वाल, सुनीता जेऊरकर, मंदार वानखेडे, रूपाली टेकाडे, अविनाश गुरजार, नंदा सोनवणे, मनोज ढोके, वीणा ठाकरे हे 16 उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संकेत सिंग दीक्षित व पुष्पा काळे यांनी विजय मिळविला. कॉंग्रेस पक्षाला मात्र या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. निवडणुकीचा निकाल घोषित होताच भाजप-सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची विजयी रॅली शहरातून काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com