दलितांना भडकावून काँग्रेसचे राजकारण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - दोन दिवसांपूर्वी दलितांच्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या विरोधात केलेल्या काँग्रेसने केलेल्या उपवास आंदोलनाला आज गुरुवारी भाजपने लाक्षणिक उपोषणाने प्रत्युत्तर दिले. काँग्रेस दलितांना भडकावित आहे, जातिवाद निर्माण करून देशातील वातावरण कलुषित करीत असल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला. 

नागपूर - दोन दिवसांपूर्वी दलितांच्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या विरोधात केलेल्या काँग्रेसने केलेल्या उपवास आंदोलनाला आज गुरुवारी भाजपने लाक्षणिक उपोषणाने प्रत्युत्तर दिले. काँग्रेस दलितांना भडकावित आहे, जातिवाद निर्माण करून देशातील वातावरण कलुषित करीत असल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला. 

साठ वर्षे काँग्रेसने देशात राज्य केले. आता सत्ता गेल्यावर त्यांना दलित आणि मुस्लिमांचा  पुळका आला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेसमुळे पुन्हा सत्तेवर येणे अवघड असल्याचे दिसताच काँग्रेसने जातिवादाचे अस्र उगारले आहे. याकरिता कधी दलित तर कधी मुस्लिमांना भडकावले जात आहे. हा सर्व खटाटोप पुन्हा सत्तेवर येण्यासाठी चालविला  आहे. 

याकरिता देशात अशांतता पसरवून जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी भाजपच्या नेत्यांनी केला. आपले घोटाळे उघडकीस येतील अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. याकरिता संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. ही लोकशाहीची हत्याच असल्याचाही आरोप करण्यात आला. 

संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी १० ते सायंकाळी पाच यावेळेत भाजपतर्फे उपोषण करण्यात आले. खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, गिरीश व्यास, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दिकी, सुभाष पारधी,  अर्चना डेहनकर, निशा सावरकर, संदीप जाधव, रमेश मानकर, विलास त्रिवेदी, कीर्तिदा अजमेरा, अरविंद गजभिये, संजय डेकाडे, किशोर पलांदूरकर, दयाशंकर तिवारी, प्रमोद पेंडके, बंडू राऊत, चंदन गोस्वामी, दिव्या धुरडे, प्रगती पाटील, संजय ठाकरे, अजय बोढारे, श्रीकांत देशपांडे, रमेश कानगो यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

बीजेपी उपोषण
खासदार डॉ. विकास महात्मे यांना सरबत पाजून भाजपचे उपोषण सोडताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. यावेळी उपस्थित गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, प्रमोद पेंडके, उपमहापौर दीपराज पारडीकर.

दलितांवरील अत्याचारापासून तर नीरव मोदींपर्यंत सर्व प्रश्‍नांवर मोदी सरकारची चर्चेची तयारी आहे. मात्र, चर्चा झाल्यास सर्व प्रश्‍न आपणावरच बुमरॅंग होतील हे लक्षात आल्याने २३ दिवस संसदेचे कामकाज काँग्रेसने होऊ दिले नाही. हा सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी उपोषण करण्यात आले.
- आमदार गिरीश व्यास प्रदेश प्रवक्ते, भाजप

Web Title: BJP fasting dalit congress politics