मुंबईत अपेक्षेपेक्षा जास्त यश - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई भाजपचं मनापासून अभिनंदन. आमच्या कामाचं जनतेने स्वागत केलं. आणि आम्हाला नागपुरात मोठ यश मिळालं.

नागपूर- महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं. भाजपला मुंबईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं, असे प्रतिपादन भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

नितीन गडकरी म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष शेलार यांनी मोठे प्रयत्न केले, त्याला यश मिळालं. मुंबई भाजपचं मनापासून अभिनंदन. आमच्या कामाचं जनतेने स्वागत केलं. आणि आम्हाला नागपुरात मोठ यश मिळालं."

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि चांगलं यश मिळालं. मुंबईत झालेल्या शिवसेना भाजपमधील 'तू तू मैं मैं' वर त्यांनी संगितलं, की निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, असे गडकरी यांनी सांगितले. 
 

Web Title: bjp got unexpected success, says nitin gadkari