केवळ मतांसाठी धारणी सामूहिक बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, चित्रा वाघ यांचा आरोप

bjp leader chitra wagh criticized mahavikas aghadi government on dharani mass physical abused
bjp leader chitra wagh criticized mahavikas aghadi government on dharani mass physical abused

अमरावती - धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. मात्र, केवळ मतांसाठी सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. मात्र, सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. आज त्या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी धारणीमध्ये दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. 

नेमकं काय घडलं?

बसची वाट पाहत असलेल्या महिलेला दोन तरुणांनी थोड्याच अंतरावर बस उभी असल्याचे सांगून तिला मोटारसायकलवर बसविले. त्यांनी महिलेला धारणीहून टेंबली जवळच्या एका शेताजवळ नेले. तिथे त्यांनी या महिलेला मारहाण सुरू केली. या दोघांनी बळजबरीने तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले. मात्र, सताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी दीघडे आणि शिवराय कुळकर्णी यांनी केला. आज चित्रा वाघ यांनी धारणी येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

सामूहिक बलात्कार असताना 376-2 ऐवजी केवळ 376 कलम लावण्यात आले होते. पीडित महिला दलित असूनही अॅट्रोसिटी अॅक्ट लावण्यात आलेला नव्हता. मंगळवारी भाजपने याप्रकरणी तत्काळ पावले उचलण्याचा अल्टीमेटम पोलिसांना दिला. दोन दिवसांत पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याबद्दल भाजपने राज्य सरकारचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com