भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांच्या वडिलांचे नागपुरात निधन

bjp leader sudhir mungantiwar father Dr Sachchidananda Mungantiwar passes away at nagpur
bjp leader sudhir mungantiwar father Dr Sachchidananda Mungantiwar passes away at nagpur

चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे वडिल डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे आज नागपूरमध्ये निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्यानंतर नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (bjp leader sudhir mungantiwar father Dr Sachchidananda Mungantiwar passes away at nagpur)

सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे थोरले तर चंद्रपूर येथील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे धाकटे चिरंजीव आहेत. याशिवाय त्यांच्या मागे त्यांची मुलगी- जावई व इतर मोठा परिवार आहे.

चंद्रपूर व विदर्भातील जुन्या पिढीतील प्रख्यात वैद्यक व्यवसायी म्हणून डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांची विशेष ओळख होते. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडलेल आहेत. त्यांनी संघातील शहर-जिल्हा व विभाग स्तरावरील विविध पदे हाताळली आहेत.

bjp leader sudhir mungantiwar father Dr Sachchidananda Mungantiwar passes away at nagpur
'आम्ही प्रयत्न केला...'; बैठक संपताच काँग्रसकडून पहिली प्रतिक्रिया

यासोबतच त्यांनी १९६७ मध्‍ये भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूरमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवली. त्‍यांचे पार्थिव शनिवार, ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यानंतर सायंकाळी ४.३० वाजता कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून अंत्‍ययात्रा निघेल आणि शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत.

bjp leader sudhir mungantiwar father Dr Sachchidananda Mungantiwar passes away at nagpur
सरकार अस्थिर करण्यासाठी निवडणूक लादली, राऊतांचा भाजपवर आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com