भाजप दक्षिण आघाडी संघभूमीत टाकते आहे कात

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहराचे स्थान राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अग्रस्थानी असते. गेल्या काही वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणूनही नागपूरला ओळखल्या जाऊ लागले. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मागे उभे असलेल्या जनमताचे परीक्षण केल्यास त्यात दाक्षिणात्य मतदारांचा वरदहस्त असल्याचे जाणवते. अर्थात संघभूमीत भाजप दक्षिण आघाडी कात टाकते आहे.

गेल्या काही दशकात इडली दोसा व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण भारतीय लोकांचा आज प्रचंड मोठा समुदाय नागपुरात स्थायिक झाला. काहींचे तर उभे आयुष्यच उपराजधानी नागपुरात गेले. मुळातच इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या या लोकांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नेहमीच हातभार लावला. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विजयामागे दक्षिण भारतीय मतदारांचा सिंहाचा वाटा आहे.

एकात्मतेचा मंत्र देणाऱ्या संघभूमीत भाजपच्या विविध आघाड्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश आघाडींचे नेतृत्व संघस्वयंसेवकांकडे असून, हे सदस्यांनी गृहसंपर्काद्वारे सुमारे दोन लाख मतदार जोडले असल्याची माहिती एका संघअभ्यासकांनी दिली. निवडणुकांच्या काळात भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे सुमारे आठशे सदस्यांनी अहोरात्र काम केले. इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकांचे वारे संपताच, त्यातले सुमारे तीनशे सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून सक्रियतेने काम करीत असून, शहराच्या सर्वच विधानसभा मतदारसंघात दक्षिण भारतीय मतदार विक्रमी संख्येने मतदान करतील याच्या ते प्रयत्नात आहेत. या संपूर्ण नियोजनाचे नेतृत्व भाजप दक्षिण आघाडीचे शहराध्यक्ष सिबु कृष्णा नायर यांच्याकडे असून, त्यांच्या मार्गदर्शनात पश्‍चिम नागपूर मतादरसंघातून गणेश मांतापूरवे, पूर्व नागपूर मतदारसंघातून गिरीश पिलै, उत्तर नागपूर मतदारसंघातून जंबू सोमुलकर, दक्षिण नागपूर मतदारसंघातून प्रकाश पिले, मध्य नागपूर मतदारसंघातून विनोद नायडू, दक्षिण पश्‍चिम मतदारसंघातून अमित मतालियार यांच्यासह जयराज पोतराज, संदीप पिल्लई, नागराजन, सागर मांतापुरे कार्यरत आहेत.

गत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने सुमारे दोन लाख दक्षिण भारतीय मतदारांनी मतदान केले असल्याचे संर्वेक्षण असून, शहरातल्या सुमारे साडेतीन लाख दक्षिण भारतीयांमधून दोन लाख भाजपचे सदस्य असल्याची माहिती एका विश्‍लेषकांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com