भाजपचे अमरावतीत विचारमंथन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्‍चित केली असून, या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 4) येथे पश्‍चिम विदर्भ विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक गुप्त असल्याचे सांगण्यात आले व प्रसार माध्यमांना प्रवेश नव्हता.
नामदार चैनसुख संचेती, विजय पुराणिक, डॉ. उपेंद्र काठेकर, रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, संजय कुटे, मदन येरावार, डॉ. रणजित पाटील, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके, डॉ. सुनील देशमुख या मान्यवरांसह पश्‍चिम विदर्भातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

अंजनगावबारी मार्गावरील प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंटच्या मैदानात ही बैठक झाली. गेल्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नव्हती, अशा स्थितीत सर्वच जागा भाजप व शिवसेनेने लढविल्या होत्या. मात्र, या वेळी युती असल्याने या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये असंतोष आहे. या पार्श्‍वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. कोणते मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल आहेत तसेच पश्‍चिम विदर्भातील कोणत्या जागांवर भाजपला मेहनत करण्याची आवश्‍यकता आहे, यावर चर्चा झाल्याचीसुद्धा माहिती आहे.
विशेष म्हणजे, येत्या 6 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्‍वनाथ येथे विधिवत पूजा करून राष्ट्रीय सदस्यता अभियानाला सुरुवात करणार आहेत. याच दिवशी सर्वत्र सदस्यता मोहिमेला सुरुवात होणार असल्याने त्या मुद्द्यावरसुद्धा चर्चा झाली असून जबाबदाऱ्या देण्यात आल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp meeting at amravati