भाजपचे आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

अकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या निवडीला वंचित बहजुन आघाडीचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अकोला: अकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या निवडीला वंचित बहजुन आघाडीचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोट मतदासंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाकळे विजयी झाले. त्यांना 48 हजार 586 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. संतोष राहाटे यांना 41 हजार 326 मतं मिळाली होती. मत मोजणीच्या वेळी 25 व्या राऊंडच्यामध्ये मत मोजणीमध्ये तफावत आढळून आल्याचे याचिकार्त्यांचे म्हणणे आहे. याव्यतिरीक्त आमदार भारसकाळे यांनी 2009, 2014 व 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञालेखात शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिली असून, आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत चुकीचा दर्शविला असल्याचा आरोप याचिकार्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांकडून नागपूरचे अॅड. संदीप चोपडे हे न्यायालयीन कामकाज पाहत आहे. याबाबत आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार मराठा विरोधी

आमदारांच्या माहितीत घोळाचा आरोप
आमदार प्रकाश भारसाकळे यांचे अकोट मतदारसंघातील यादीमध्ये घर क्रमांक ३१५ (ब) ची नोंद आहे. मात्र या क्रमांकाचे घरच अस्तित्वात नसल्याचे नगर परिषदेने लेखी स्वरुपयात कळवल्याचे याचिकार्त्याचे म्हणणे आहे. याव्यतिरीक्त आमदार भारसाकळे यांचे नाव दर्यापूर मतदारसंघातील मतदार यादीत सुद्धा आहे. लोकप्रतिनिधी अधिनियमनानुसार एका व्यक्तिला दोन विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येत नाही, असा दावा याचिकार्त्याने केला आहे.

काय आहे या लिंकमध्ये? -  अरे बापरे...! सेवानिवृत्त अभियंत्याकडे सापडले किलोभर सोने अन् पाव किलो चांदी

सन् २००९मध्ये अकोट येथून निवडणूक लढवितांना सादर केलेल्या दस्तावेजात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी रहिवाशी पत्ता अकोट नगर पालिका क्षेत्रीतील नमूद केला. मात्र २०१४च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञालेखात रहिवाशी पत्ता दर्यापूर तालुक्यातील बनोसा येथील नमूद केला आहे, असे याचिकाकत्याचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Bharsakale's choice challenged in court