आमदार संजय कुटे घेत आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका

bjp
bjp

संग्रामपूर : मध्यप्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलण्याच्या दृष्टीने आमदार संजय कुटे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन विजयी होण्याचे गुपित मांडत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपाला काहीही करून निवडणुक जिंकायची आहे, असा चंग भाजपने बांधला असून महाराष्ट्रातील आमदारांना सुद्धा या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी दिली आहे.

त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार व मुख्यमंत्र्यांच्या कोअर टीमचे सदस्य डॉ. संजय कुटे यांच्याकडे बुलढाणा ते नागपूर सीमेलगतच्या मध्यप्रदेशातील १४ जिल्ह्यातील ६४ मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ.कुटे 29 ऑक्टोबरपासून मध्यप्रदेशात कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देत आहेत.

महाराष्ट्रातील जे प्रवाशी भाजप कार्यकर्ते प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये गेलेले आहेत. त्याचे संयोजक म्हणून संजय कुटे हे कार्य करीत आहेत. आमदार संजय कुटे यांनी मध्यप्रदेश दौऱ्यावर खंडवा, बुरहानपूर, बैतुल, खरगोण, होशंगाबाद, हरदा या जिल्ह्यात जावून भाजप कार्यकर्त्यांच्या मतदार संघ निहाय बैठका घेत आहेत. सरकारने केलेली विकास कामे प्रभावीपणे शेवटच्या घटकात कसे पोचवावे याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करीत आहेत. सोबतच मेळावे आणि कोपरा सभा घेऊन भाजपाला विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रोत्साहित करीत आहेत . त्याच्या दौऱ्याची माहीती त्याचे सोबत असलेले नंदकिशोर अग्रवाल यांनी दिली.

या दौऱ्याचा अहवाल भाजप प्रदेश व केंद्रीय कार्यकारिणीला ते पाठविणार आहेत. दिवाळीनंतर आमदार कुटे जबलपूर, कटणी, दिंडोरी, मांडला, शिवणी, बालाघाट, छिंदवाडा या जिल्ह्यातील मतदार संघाचा दौरा करुन भाजप कार्यकर्त्यासोबत हितगुज करतील. व तसा अहवाल पक्षाकडे पाठविणार आहेत. पक्षाने  माझेवर फार मोठी जबाबदारी टाकली असून ती विजयातून पूर्ण करण्यासाठी  मी आणि माझी टीम कामाला लागली आहे. मध्यप्रदेश मधील गावामध्ये नागरिकासोबत होत असलेल्या संवाद वरून पुन्हा भाजपा सत्तेवर येईल असे वातावरण निर्मितीचे लक्ष्य घेऊन पक्षश्रेष्टी व आम्ही सर्व प्रचाराची रणनीती तयार करीत असल्याचे मत आमदार संजय कुटे यांनी बोलण्यातून व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com