होमगार्डला मारहाण, भाजप आमदाराविरुद्घ गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वणी शहरात जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली आहे. या विभागात पोलिस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी 20 होमगार्ड देण्यात आले. मंगळवारी (ता. तीन) होमगार्ड प्रकाश बोढे हे टिळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत होते.

वणी (जि. यवतमाळ) : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता पोलिसांसोबत कर्तव्यावर तैनात असलेल्या होमगार्डने ट्रिपल सीट दुचाकीस्वाराला चालान दिली. त्याचा जाब विचारत एका आमदाराने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याबाबत होमगार्डने दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

वणी शहरात जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली आहे. या विभागात पोलिस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी 20 होमगार्ड देण्यात आले. मंगळवारी (ता. तीन) होमगार्ड प्रकाश बोढे हे टिळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत होते. दरम्यान, दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांना अडवत चालान फाडावी लागेल, असे सांगितले. एका युवकाने ही माहिती आमदार बोदकूरवार यांना दिली. 
 

No photo description available.

गणवेशात का नाही? 
त्यांनी आपल्या वाहनाने तत्काळ टिळक चौक गाठले. होमगार्ड खाकी फुल पॅंटवर पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून असल्याने आमदारांनी त्याला गणवेशात का नाही, असा प्रश्न केल्याची चर्चा आहे. लगेच होमगार्डने वाहतूक शाखा गाठून वरिष्ठांना हकिगत सांगितली. शासकीय काम करीत असताना आमदार बोदकुरवार यांनी माझ्या कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार दिली. त्यामुळे बोदकुरवार यांच्याविरुद्ध कलम 186अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. 

हेही वाचा... बाळाला वाचविण्यासाठी आईने तोडू दिले लचके

काही दिवसांपूर्वीच केले रास्ता रोको 
वाहतूक पोलिस शहराबाहेर उभे राहून येणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांना अडवितात. विविध नियम लावून वाहनचालकांकडून वसुली करतात. अशा तक्रारी आमदार बोदकुरवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आमदारांनी काही दिवसांपूर्वीच वरोरा मार्गावरील टी-पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली होती. 

सविस्तर वाचा - मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

मारहाण केली नाही 
होमगार्ड कर्तव्यावर असताना त्याने गणवेश परिधान केला नव्हता. त्यामुळे मी त्याचा हात पकडून गणवेशात का नाही, अशी विचारणा केली. त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
- संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार, वणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp mla slaps homeguard complaint registered