Vidhan Sabha 2019 : तिरंगी लढतीत भाजपला राष्ट्रवादीचे बळ!

File photo
File photo

चंद्रपूर :एकाकी पडलेल्या भाजपला राजुरा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ मिळाल्याने येथील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहे. शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप तब्बल दहा वर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चटपांचा फटका भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार ऍड. संजय धोटे यांना बसेल, हे गृहीत धरून भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच गळाला लावले आणि होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई केल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
राजुरा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार ऍड. संजय धोटे यांनाच रिंगणात उतरविले.  ऍड. धोटे मूळचे शेतकरी संघटनेचे. च्या निवडणुकीत चटप रिंगणात नव्हते. त्यामुळे चटपांची बहुतांश मते भाजपकडे वळली. अवघ्या दोन हजार मतांनी धोटेंचा विजय झाला. कॉंग्रेसनेसुद्धा पुन्हा माजी आमदार सुभाष धोटे यांनाच रिंगणात उतरविले आहे. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे.  चटप स्वतः रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मागच्या निवडणुकीत धोटेंना मिळालेली मते चटपांकडे वळू शकली, असे संकेत भाजप नेतृत्वाला मिळाले. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातूनही ही बाब समोर आली.
दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या मतदारसंघात कागदावरच आहे. माजी आमदार सुदर्शन निमकर राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, मतदारसंघ कॉंग्रेसला सुटला. त्यामुळे राजकीय भवितव्याची चिंता असलेल्या निमकरांनाच भाजपने गळाला लावले. च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्यांना या मतदारसंघात पंचवीस हजार मते मिळाली होती. निमकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव गडचांदूर नगरपालिकेतील नगराध्यक्षासह सर्वांनीच भाजपात प्रवेश केला. ही पालिका राजुरा मतदारसंघात येते. बहुतांश पदाधिकारीही भाजपात सामील झाले. त्यामुळे चटपांपासून होणारे नुकसान भरून निघेल, अशी शक्‍यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसच्या उमदेवारासमोर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गोदरू पाटील जुमनाके यांचे आवाहन आहे. जुमनाके यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दलित आणि आदिवासींची मते कॉंग्रेसपासून दुरावू शकतात, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. या मतदारसंघात सध्यातरी भाजप, कॉंग्रेस आणि शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत आहे. मात्र, यात भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाल्याने त्यांचे बळ वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com