वर्ध्यामध्ये भाजपची सत्ता कायम राष्ट्रवादीला धक्का 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - वर्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत घेतले असून सत्ता कायम राखली आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ सुरेश देशमुख यांचा पूर्ण पराभव झाला असून राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळू शकली. 

वर्धा जिल्हा परिषदेत असलेल्या 52 जागांचे निकाल घोषित झाले असून त्यापैकी भाजपला 29 जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते दत्ता मेघे भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची बाजू भक्कम झाली होती. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. 

वर्धा जिल्ह्यात कॉंग्रेसला कोणतेही नेतृत्व नाही. तसेच गटबाजीमध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसला 16 जागा घेऊन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याजिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगले प्रस्थ होते. सहकार क्षेत्रातील सुरेश देशमुख यांचा चांगलाच प्रभाव आहे. या सुरेश देशमुख यांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगले यश मिळविता आले नाही. हिंगणघाट तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांनाही फारसे काही करून दाखविता आले नाही. वर्धा, हिंगणघाट या परिसरात शिवसेनेचे चांगला प्रभाव होता. सेनेचे अशोक शिंदे हिंगणघाटचे आमदार होते. सेनेला या निवडणुकीत केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सेनेला चांगले यश दाखविता आले नाही.

Web Title: BJP retained power in wardha