सावनेरमध्ये भाजप सक्षम उमेदवारांच्या शोधात; मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीला चढतोय राजरंग

सावनेरमध्ये भाजप सक्षम उमेदवारांच्या शोधात; मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीला चढतोय राजरंग

 सावनेर (जि. नागपूर) अडीच वर्षांपूर्वी अपेक्षित असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील विकासासाठी महत्त्वपूर्ण व मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी मतदारांची चाचपणी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी भाजप व इतर पक्ष सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेस निश्‍चिंत दिसत आहे, 

विधानसभेत मिळालेले तालुक्‍यातील भरघोस मताधिक्‍य व बहुतांश ग्रामपंचायतीवर असलेला झेंडा, सक्षम कार्यकर्त्यांची फळी यामुळे कॉंग्रेस निश्‍चिंत दिसत आहे. या निवडणुकीविषयी ग्रामीण जनता व पुढाऱ्यांची उत्सुकता वाढू लागल्याने तालुक्‍यातील ग्रामीण वातावरणाला राजकीय रंग चढायला सुरुवात झाली आहे. आरक्षणामुळे काही इच्छुकांची संधी हुकली तर कुणी आपल्या सौभाग्यवतींच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तालुक्‍यात सहापैकी चार सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यात बडेगाव-खुला महिला, केळवद-ओबीसी, वाकोडी-ओबीसी महिला, पाटणसावंगी-एस.टी. महिला, वलनी- खुला, चिचोली- अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण आहे.

सौभाग्यवतीसाठी जोरदार प्रयत्न 
यात बडेगावमधून विजय देशमुख व अशोक धोटे हे त्यांच्या सौभाग्यवतीसाठी प्रयत्नशील आहेत. कॉंग्रेसकडून छाया बनसिंगे यांची वर्णी लागू शकते. वाकोडी सर्कलमध्ये भाजपच्या सुमन राऊत तर देवीदास मदनकर हे त्यांच्या सौभाग्यवतीसाठी प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसकडून सावनेर बाजार समितीचे सभापती बंडू चौधरी हेदेखील त्यांच्या सौभाग्यवतीसह, ज्योती शिरस्कर, चंदा निंबाळकर, खोरगडे, अंजली धोटे अशी अन्य नावे चर्चेत आहेत. 
पाटणसावंगी सर्कलमध्ये शांताराम मडावी विष्णू कोकर्डे यांच्या सौभाग्यवतींची नावे चर्चेत आहे भाजपकडून ज्ञानेश्वर परतेकी आणि अनिल दुर्वे यांच्या सौभाग्यवतीसाठी प्रयत्नशील आहेत.

आजी माजीचे प्रयत्न सुरूच 
केळवद सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या विद्यमान सदस्य अंजिरा उईके अनुसूचित जाती मधून आहे त्यामुळे महिलाराज कायम राहणार आहेत. कॉंग्रेसकडून शंकर मोवाडे, गोविंद ठाकरे, ईश्वर घोडमारे, सतीश लेकुरवारे आपल्या सौभाग्यवतीसाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून पल्लवी कुथे, उषा जोगी, धनश्री हजारे, रेखा काळे यांची नावे चर्चेत आहेत. वलनीमधून भाजपच्या छाया ढोले, चंद्रशेखर लांडे, राहुल तिवारी, अशोक तांदूळकर, अनिल तंबाखे, लक्ष्मण पंडागळे कॉंग्रेसतर्फे प्रकाश खापरे, मधुकर दुगाने, प्रभाकर भुरकुंडे, बबन भड, अरविंद सरोदे, सुरेश गोमकाळे, रवींद्र चिखले राष्ट्रवादीकडून किशोर चौधरी तर रिपाइंतर्फे माजी समाजकल्याण सभापती दीपक गेडाम निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवित आहेत. 

चिचोलीतून लढणार कोण 
चिंचोलीमधून रिपाइंच्या संगीता मेंढे व संजीवनी मेश्राम यांचे नाव चर्चेत आहे. कॉंग्रेसकडून कल्पना अशोक वंजाळ, कांता सुरेश रामटेके, अरुणा शिंदे, रीना ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून शोभा मोटघरे व सुशीला सरोदे यादेखील उत्सुक असल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com