Video : महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर संतापल्या; भाजप म्हणजे सत्तेसाठी वळवळणारा शेणातला कीडा

BJP started a literal war against Yashomati Thakur
BJP started a literal war against Yashomati Thakur

अमरावती : राजस्थाननंतर महाराष्ट्र असा भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी सुरू केलेला कथित प्रचारावरून राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ऍड. यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपला त्यांनी सत्तेसाठी वळवळणारा शेणातला कीडा असे संबोधले आहे. त्यावर पलटवार करीत भाजपनेही कॉंग्रेसमधील असंतुष्टच बाहेर पडत असल्याने यशोमती ठाकूर यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्रातही कॉंग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे, असा प्रचार सोशल मीडियावरून सुरू झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यशोमती ठाकूर यांनी भाजपला शेणातला कीडा असे संबोधून महाराष्ट्रात भाजप असे फोडाफाडीचे राजकारण करणार असेल तर गाठ माझ्याशी आहे. कॉंग्रेसशी आहे, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला होता.

केंद्रात सत्ता मिळाली असताना भाजपला राज्यातील सत्तेची हाव आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे. या सरकारने देशासमोर नवा फॉर्म्यूला ठेवला असून, तो दीर्घकाळ टिकेल. कोणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलेच बदडू. आम्ही गांधीवादी आहेत. पण, भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. 

कॉंग्रेसच नेतृत्वहीन

यशोमती ठाकूर यांच्या या इशाऱ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी उत्तर देत यशोमती ठाकूर यांचा इशारा सवंग प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे. भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत नाही. स्वतः कॉंग्रेसच नेतृत्वहीन झाल्याने व कॉंग्रेसमध्ये भविष्य दिसत नसल्याने विविध राज्यातील कॉंग्रेसचे आमदार भाजपत दाखल होत आहेत. महाराष्ट्रातही असे काही होऊ शकते, याची कदाचित चाहूल यशोमती ठाकूर यांना लागली असावी, असे त्या म्हणाल्या.

सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा क्‍लूप्त्या

सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा क्‍लूप्त्या अधून मधून लढविणे ही यशोमती ठाकूर यांची जुनीच सवय आहे. मंत्री राज्याच्या असताना त्या राज्यात फिरून लोकांचे प्रश्‍न सोडविण्या ऐवजी अमरावतीत बसून नुसत्या उठाठेवी करीत आहेत. अशी टीका सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केली. या प्रतिक्रियांमुळे राजकीय क्षेत्रातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com