3 ऑक्‍टोबरला भाजप करणार धमाका?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर : चार ऑक्‍टोबर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस असल्याने आदल्या दिवशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडून भाजप मोठा धमाका करणार असल्याचे समजते. यात शहर आणि नागपूर जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : चार ऑक्‍टोबर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस असल्याने आदल्या दिवशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडून भाजप मोठा धमाका करणार असल्याचे समजते. यात शहर आणि नागपूर जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून रोज वेगवेगळ्या बातम्या येथून धडकत आहे. सोशल मीडियावर उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या जात आहेत. गुरुवारी कॉंग्रेस आणि भाजपचीही दिल्लीत बैठका झाल्या. यामुळे अफवांना आणखीच ऊत आला आहे. कॉंग्रेसच्या काही उत्साही पदाधिकाऱ्यांनी जुनीच यादी सोशल मीडियावर टाऊन खळबळ उडवून दिली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला कामाला लागा, तुमची उमेदवारी पक्की असल्याचे खासगीत सांगितल्याचा दावा करीत आहेत. आघाडी आणि युतीला दोघांनाही बंडखोरी भीती सतावत असल्याने तीन ऑक्‍टोबरपूर्वी उमेदवारांची यादीच जाहीर केली जाणार नसल्याचे समजते. चर्चा आणि बैठकांच्या माध्यमातून शेवटपर्यंत ताटकळत ठेवले जाणार असल्याचेही समजते.
दिल्लीत ठरले, गल्लीत बदल
दिल्लीत बैठक झाल्यानंतर विकास ठाकरे, गिरीश पांडव, नितीन राऊत, बंटी शेळके यांची नावे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले होते. काही नेते शुक्रवारी दिल्लीतून नागपुरात परतताच यादी बदलली आहे. दक्षिणेत प्रमोद मानमोडे आणि विशाल मुत्तेमवार, मध्यमधून ऍड. कुरेशी आणि नंदा पराते, पूर्व नागपूर विधानसभेसाठी उमाकांत अग्निहोत्री यांची नावे पॅनेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले. यातूनच एकाची निवड होईल, असे दावे केले जात आहे.
भाजपचे वेट अँड वॉच
भाजप काही विद्यमान आमदारांना डच्चू देणार असल्याचे समजते. त्यामुळे अद्याप कोणाचेच नावे जाहीर करण्यात आलेले नाही. काहींच्या जागाही बदलवल्या जाणार आहेत. त्यामुळे काही आमदार अस्वस्थ आहेत. निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया होऊ नये व नाराजी व्यक्त करण्यास जास्त संधी मिळू नये याची कळजी घेतल्या जात आहे. याच कारणामुळे भाजपनेही "वेट अँड वॉच' धोरण अवलंबविले असल्याचे समजते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will surprise on October 3?