मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पाठिंबा काढेल याची भीती; यशोमती ठाकूरवरून चंद्रकांत पाटील यांचा चिमटा

BJPs agitation against Yashomati Thakur
BJPs agitation against Yashomati Thakur

तिवसा (जि. अमरावती) : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिसाला मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजप नेते, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी तिवसा येथे यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकासआघाडी विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजीनामाचा एल्गार अमरावती भाजपच्या वतीने पुकारण्यात आला आहे. तिवसा शहरात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करीत असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना यशोमती ठाकूर व मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला.

मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यानेच ते यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेत नाही आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. जोपर्यंत ठाकूर या राजीनामा देत नाही तोपर्यंत भाजप आंदोलन करीत राहील अशी पुष्टी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केली. येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

नारेबाजी करीत केला निषेध

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रसंताच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. महाविकासआघाडी व यशोमती ठाकूर यांच्या विरोधात उपस्थित असलेल्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत निषेध केला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com