Election Results 2019 : हिंगणा मतदारसंघ : भाजपचे समीर मेघे तब्बल 18 हजार 558 मतांनी आघाडीवर 

file photo
file photo

नागपूर : संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून असलेल्या हिंगणा मतदारसंघातून भाजपचे विद्यमाने आमदार समीर मेघे यांना तब्बल 18 हजार 558 मतांची आघाडी मिळाली आहे. तेराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार विजय घोडमारे यांना 28 हजार 503 मते मिळाली असून, मेघे यांना प्रचंड आघाडी मिळाली आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वेळी भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांना भाजपचे समीर मेघे यांच्याविरोधात मैदानात उतरविले आहे. घोडमारे त्यांचे तिकीट कापल्याचा बदला घेण्यासाठी घोडमारे यांनी तयारी केली होती. आक्रमक, आकर्षक प्रचारात समीर मेघे यांनी तूर्तास बाजी मारली. हिंगणा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र बंग यांनी पुढाकार घेत विजय घोडमारे यांचा पक्षप्रवेश व उमेदवारी निश्‍चित करण्यात मोठी भूमिका बजावली होती. घोडमारे यांच्या प्रचाराचे सूत्रधारही बंग हेच आहेत. सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेले बंग यांचे वर्चस्व मोडण्यासाठी समीर मेघे यांनी कंबर कसली. ही लढत बंग व घोडमारे यांचे भविष्य ठरविणारी आहे. तर, समीर मेघे यांना राजकारणात स्थिरावणारी ही निवडणूक ठरणार आहे. मतदारसंघातील अनुसूचित जातीची मतेही निर्णायक ठरणार आहेत. वंचितचे उमेदवार नितेश जंगले यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com