पगारवाढीसाठी खासदारांचा गोंधळ हा काळा दिवस -  वरुण गांधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक खासदारांकडे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तसे शपथपत्रतच त्यांनी निवडणूक आयोगाला भरून दिले आहे. असे असताना पगारवाढीसाठी संसदेत गोंधळ घालणे हे दुदैवच म्हणावे लागेल. गोंधळ घातला तो दिवस आपल्यासाठी काळा दिवस असल्याचे खासदार वरुण गांधी म्हणाले. 

नागपूर - लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक खासदारांकडे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तसे शपथपत्रतच त्यांनी निवडणूक आयोगाला भरून दिले आहे. असे असताना पगारवाढीसाठी संसदेत गोंधळ घालणे हे दुदैवच म्हणावे लागेल. गोंधळ घातला तो दिवस आपल्यासाठी काळा दिवस असल्याचे खासदार वरुण गांधी म्हणाले. 

युवा मुक्ती अभियानतर्फे वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित युवा परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदारांनी त्यांचे मानधान हे समाजकार्यासाठी दान करावे, असा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना दिला. नऊ वर्षांच्या काळात मी एक रुपयाही मानधान घेतले नाही. त्यामुळे लोकसभेमध्ये मी एकट्याने वेतनवाढीचा विरोध केला होता. नैतिकदृष्ट्या ही गोष्ट मला मान्य नाही. बटन दाबा, लोकप्रतिनिधी निवडून द्या आणि पाच वर्षांसाठी त्याचे गुलाम म्हणून रहा अशी राजकीय व्यवस्था देशासाठी घातक आहे, असेही वरुण गांधी म्हणाले. 

कुठलाही जनप्रतिनिधी हा शंभर टक्के जनतेची मते घेऊन निवडून येत नाही. मतदानातील काही टक्के मते त्याला मिळाली असतात. त्यामुळे विरोधी बाकावर बसणाऱ्या प्रतिनिधींचाही सन्मान व्हायला हवा. विरोधी पक्षातील एखादे प्रतिनिधी हे विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, तर त्यांनाही मंत्रीपद देता येइल का? यावर विचार व्हावा, असे सांगत येत्या काळात अशा नैतिक राजकीय व्यवस्थेची मी स्वप्न बघत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर विचारधारेचे चिंतक अशोककुमार भारती, युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. केशव वाळके उपस्थित होते. समाजात उत्कृष्ठ काम करणारे मारोती चवरे, संजीवनी ठाकरे, महेश पवार, प्रशांत डेकाटे, श्रीकांत भोवते, गौरव टावरी यांचा "युवा कृतज्ञता सम्मान' देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता नितीन चौधरी यांनी आभार व्यक्त केले. 

श्रीमंत-गरिबातील दरी वाढलेलीच 
देशाला स्वांतत्र्य मिळून बरीच वर्षे झालीत. या काळात देशाने अपेक्षित अशी प्रगती केली; परंतु दुसरीकडे गरीब आणि श्रीमंतांमधील दरीही वाढली आहे. आज ती दरी कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. शिवाय बलात्काऱ्याला कुठलेही वय नसून त्यावर कठोरच कारवाई व्हावी अशी मागणी वरुण गांधी यांनी केली. 

Web Title: The black day of turmoil for the increase in salary