निंदनीय! विद्यार्थिनीला केली शारीरिक संबंधाची मागणी

file photo
file photo

नागपूर : किराणा दुकानाच्यावर असलेल्या ट्यूशन क्‍लासला येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनीशी दुकानदाराने अश्‍लील चाळे करून विनयभंग केला. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून रूपेश शिवनारायण जयस्वाल (34, रा. चंदननगर, मेडिकल चौक) याला अटक केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलगी मेडिकल चौकात आईसोबत राहते. वडील शासकीय नोकरीत असल्यामुळे बाहेरगावी राहतात. मुलगी बारावीत असून, ट्यूशनला मेडिकल चौकातील क्‍लासमध्ये जाते. रूपेशचे किराणा दुकान असलेल्या इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर ट्यूशन क्‍लास आहे. यामुळे त्यांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. शनिवारी सायंकाळी मुलगी क्‍लासला आली असता आरोपीने गाठले. तिला चॉकलेट देत खाण्यास सांगितले. तिने नकार दिला असता रूपेश बळजबरी करू लागला. माझ्या हातानेच चॉकलेट खावे लागेल, असे म्हणून दम देऊ लागला. 
मुलगी घाबरली असता रूपेशने जबरदस्तीने चॉकलेट खाऊ घातले. त्याने अश्‍लील भाषेचा वापर करीत मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तसेच तिला वारंवार फोन करून शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्‍सोचा गुन्हा दाखल करून अटक केली. 
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? 
ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताची आहे. मुलगी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. दुकानदार रूपेश जयस्वालशी संपर्क साधून "सेटल' करण्याचा प्रयत्नही झाल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याबाबत एएसआय डेहनकर यांनी मुलीचे वडील बाहेरगावी असल्याचे कारण सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com