निंदनीय! दिव्यांग 22 दिवसांपासून उपचारापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर: किडनीच्या आजाराने त्रस्त गरीब दिव्यांग रुग्ण एक सप्टेंबरला छिंदवाडा येथून उपचारासाठी आला. प्रारंभी मेयोत गेला. त्याला मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलने त्याला सुपर स्पेशालिटीत रेफर केले. अशाप्रकारे इकडून तिकडे खेटा घालण्यात 22 दिवस निघून गेले. उसनवारीवर घेतलेले पैसेही संपले. मोफत उपचाराचा देखावा करणाऱ्या सरकारच्या रुग्णालयात दिव्यांगाची अशी उपेक्षा होत असल्याने येथेच आपला मृत्यू होईल, अशी भावना दिव्यांग सचिन जैन (35) याने व्यक्त केली.

सचिनचे दोन्ही पाय अधू आहेत. अशातच त्याला किडनीचा आजार झाला. त्याला किडनीतून कॅथेटर लावण्यात आले. यामुळे त्याला असह्य वेदना होत आहे. सुपरमध्ये किडनी विभागापासून तर युरोलॉजी येथे खेटा घातल्या. मेडिकलमध्येही तो राहिला; परंतु कोणीही दखल घेत नव्हते. उपचार नाही. रात्रीचा निवारा नाही. सचिनची अशिक्षित पत्नी शिवणकाम करून घरचा खर्च भागवते. दिव्यांग असलेल्या कुंकवाला अशाही स्थितीत जगवते. मात्र, येथील डॉक्‍टरांना या रुग्णावर उपचार करावेसे का वाटत नाही? हा खरा सवाल आले.
प्रारंभी सचिनला मूळव्याधचा त्रास होता. यामुळे छिंडवाड्यातील रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रिया केली. हा आजार दुरुस्त होत असतानाच त्याला किडनी विकाराने ग्रासले. येथील डॉक्‍टरांनी त्याला नागपुरात उपचारासाठी पाठवले. प्रथम मेयो रुग्णालय गाठले. मात्र, येथून त्याला मेडिकल आणि मेडिकलमधून सुपर स्पेशालिटीत रेफर करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blasphemous! peshant Deprived of treatment