अंध सतीशसाठी परमार्थच उदरनिर्वाहाचे साधन

Blind Satish has overcome disability and successfully earning
Blind Satish has overcome disability and successfully earning

अकोला : जन्मतः पदरी पडलेले अंधत्व, नशिबाने पिढ्यांपिढ्या चालत आलेली गरिबी, खेड्यात राहत असल्याने शिक्षणाच्या सोयीसुविधा नाही, नशिबाला व भगवंताला दोष न देत संग्रामपूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील पातुर्डा येथील सतीश हरिदास राजनकार यांची गायनाची आवड व परमार्थापोटी असलेल्या प्रेम भावामुळे वयाच्या 10 व्या वर्षापासून वारकरी संप्रदायात उदरनिर्वाहाचे शोधले. हिच गायनाची आवड आज त्यांचे रोजगाराचे साधन बनली असून, दरवर्षी 15 ते 16 सप्ताहात गायन व मृदुंगाचार्याचे काम करून त्यांनी अंधत्वावर मात केली आहे. 
   
अपंग शब्दाचा उच्चार दिव्यांग झाला तरीही अपंगांच्या समस्या काही सुटल्या नाही. दिव्यांग नसतांना दिव्यांगाचे नाटक करून शासनाच्या योजनेचा फायदा घेणारे हजारो लोक मिळतात. मात्र, या भ्रष्ट कार्यप्रणालीत अंशतः दिव्यांग असलेले बांधव आजही वंचीत आहे. या बनावट दिव्यांगांना लाजवेल व अंशतः दिव्यांग असलेल्या प्रेरणा देईल अशी नेत्रदिपक कामगिरी पातुर्डा येथील सतीश हरीदास राजनकार यांनी करून दाखविली आहे. सतीश राजनकार हे खेड्यात राहत असल्याने शिक्षण घेता आले नाही. ते दहा वर्षाचे असतांना पातुर्डा येथील राधाकृष्ण मंदिरात वडाळी येथील निवृत्ती महाराज वक्टे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता. यावेळी वक्टे महाराज यांची दृष्टी सतीश राजनकार यांच्यावर पडली. त्यांनी सतीशमध्ये असलेली गायनाची आवड पाहून सतीशला योग्य मार्गदर्शन केले. वक्टे महाराज यांच्या मार्गदर्शनातून अंध सतीशने स्वतःला वारकरी सांप्रदायात वाहून घेत सर्व गुण शिकले. यामध्ये मृदुंगाचार्य, गायनाचार्य म्हणून भागवत सप्ताहामध्ये रोजगार शोधला. पूर्णता अंध असल्याने भागवतासाठी जाण्याकरीता त्यांना अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना निवृत्ती महाराज वक्टे यांनी साथ दिली. भागवत सप्ताह असलेल्या ठिकाणी सतीश महाराज यांना वक्टे महाराज स्वतः घेऊन जात असतात. सद्यस्थितीत या भागवत सप्ताहाच्या माध्यमातून त्यांना घर चालविण्यासाठी आर्थिक मदतही मिळत आहे.

वडीलांनाही लागतो हातभार -
वडील शेतमजूरी करून चरिथार्त चालवित आहे. त्यांना हातभार लागावा यासाठी सतीश महाराज देखील सप्ताहाच्या माध्यामातून वर्षाकाठी 30 ते 45 हजार रुपये मिळवीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com