रक्तदान शिबीरात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

सर्वप्रथम रक्तदान यावर रक्तपेढी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व पॅरामेडीकल डी एम एल टी कॉलेज च्या वतीने कलापथक सादर करण्यात आले. 

गोरेगाव (गोंदिया) - येथील गायत्री परिवार, दिया युवा संघटना, युवा शक्ती स्पोर्टस क्लब, जगत महाविद्यालयाच्या वतीने जगत कॉलेज सभागृहात ता २८ जुलै शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात ८३ रक्तदान दात्यांनी रक्तदान केले.

या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रासयो प्रमुख जे बी बघेले, नगर पंचायत उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, प्रा रामलाल गहाणे, आर एन साखरे, पुरुषोत्तम साकुरे, डॉ स्मिता गेडाम, अनिल गोंडाने उपस्थित होते.

सर्वप्रथम रक्तदान यावर रक्तपेढी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व पॅरामेडीकल डी एम एल टी कॉलेज च्या वतीने कलापथक सादर करण्यात आले. रक्तदान शिबीरात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे यांनी युवक, युवतींना म्हटले की, रक्तदान करणे हे पुण्याचे काम आहे. याकरीता रक्तदान करणे आवश्यक आहे. गायत्री परीवार, युवा स्पोर्टस क्लब गेल्या वर्षीपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करीत आहे, हे प्रशंसनीय कार्य आहे. 

नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगितले की, गेल्यावर्षात झालेल्या रक्तदान शिबीरात ८७ रक्तदान दात्यांनी रक्तदान केले होते यावर्षी सुद्धा युवकाची उपस्थीती असल्याने गायत्री परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले. यानंतर रक्तदान दात्यांना वृक्ष लागवडी करीता प्रत्येकी एक झाड देवुन सत्कार करण्यात आले.

सुत्रसंचालन विकास बारेवार यांनी केले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी जगत महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी, युवा स्पोर्टस क्लब चे पदाधिकारी, गायत्री परिवार यांनी सहकार्य केले. 

Web Title: Blood Donation by 83 donors in blood donation camp at Goregaon Gondiya