यिनतर्फे रक्तदान शिबिर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि रोटरी क्‍लबच्या संयुक्त विद्यमाने (ता. १२) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमात यिनचे जिल्हा समन्वयक सूरज इमले, रोटरी क्‍लबचे जगदीश लांजेवार, यिनच्या ऊर्जा मंत्री गीता बावणे उपस्थित होत्या. सूरज इमले यांनी यिनची भूमिका मांडली. ‘सकाळ’ने युवकांसाठी सुरू केले व्यासपीठ म्हणून ‘यिन’ नावारुपास येत असल्याचे सांगितले. जगदीश लांजेवार म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास २५ च्या वर यिन आणि रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी यिन सदस्य सुरेंद्र खैरनार, स्वप्नील मुंढे, संतोष पावडे, किशन पावडे, वैभव सूर्यवंशी, संतोष केंद्रे, अविनाश कांगे, रोशन बावीस्कर, उदय भुते, विराज मेघे इत्यादी उपस्थित होते. 

Web Title: Blood Donation Camp YIN

टॅग्स