युवकाला कारने उडविण्याच्या प्रयत्नानंतर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

नागपूर  ः रस्त्यावर कुत्रा फिरविण्यासाठी बाहेर निघालेल्या एका युवकावर तीन आरोपींनी कार चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कारमधून उतरून युवकावर चाकूने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराला नंदनवनमधील देशपांडे ले-आउटमध्ये घडली. अक्षय अशोक खोब्रागडे (वय 28, रा. देशपांडे ले-आउट) असे जखमी युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय खोब्रागडे हा सोमवारी रात्री साडेअकराला कुत्रा घेऊन फिरवायला गेला होता. देशपांडे ले-आउटमधील झेरॉक्‍स सेंटरसमोरील रस्त्यावर आरोपी कारचालक शिवम जयस्वालने अक्षयच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला.

नागपूर  ः रस्त्यावर कुत्रा फिरविण्यासाठी बाहेर निघालेल्या एका युवकावर तीन आरोपींनी कार चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कारमधून उतरून युवकावर चाकूने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराला नंदनवनमधील देशपांडे ले-आउटमध्ये घडली. अक्षय अशोक खोब्रागडे (वय 28, रा. देशपांडे ले-आउट) असे जखमी युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय खोब्रागडे हा सोमवारी रात्री साडेअकराला कुत्रा घेऊन फिरवायला गेला होता. देशपांडे ले-आउटमधील झेरॉक्‍स सेंटरसमोरील रस्त्यावर आरोपी कारचालक शिवम जयस्वालने अक्षयच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षयने वेळेवर उडी घेतल्यामुळे तो थोडक्‍यात वाचला आणि कार विद्युत खांबावर आदळली. त्यानंतर कारमधून शिवम आणि त्याचे साथीदार नीरज भोयर आणि सोनू काळबांडे हे उतरले. त्यांनी चाकूने अक्षयवर वार केले. मात्र, अक्षयने ताकदीचा वापर करून त्याचे वार परतवून लावले. तरीही पायाच्या गुडघ्याला आणि गळ्याला व हाताला जखम झाली. त्यानंतरही जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अक्षयचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blowing the young man by car Knockout after trying

टॅग्स