अकोल्यात 'नायट्रेट' बाधेमुळे 'ब्लू बेबी सिंड्रोम'चा धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

अकोला - जिल्ह्यामधील भुजलातील पाण्यात नायट्रेटच्या प्रमाणाने धोकादायक पातळी गाठल्याने बालकांना होणाऱ्या ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ रोगाचा धोका वाढला आहे. ‘नायट्रेट’ रसायनयुक्त पाण्याचा गर्भवती महिलांनी पिण्यासाठी उपयोग केल्यास हा रोग होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अकोला - जिल्ह्यामधील भुजलातील पाण्यात नायट्रेटच्या प्रमाणाने धोकादायक पातळी गाठल्याने बालकांना होणाऱ्या ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ रोगाचा धोका वाढला आहे. ‘नायट्रेट’ रसायनयुक्त पाण्याचा गर्भवती महिलांनी पिण्यासाठी उपयोग केल्यास हा रोग होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जिल्ह्यात बनवण्यात आलेल्या विहिरी व हातपंपाच्या पाण्याचे रासायनिक परीक्षण केल्यानंतर दुषित आढळलेल्या ७८५ पाणी नमून्यापैकी ७२९ नमून्यात ‘नायट्रेट’चे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. काही ठिकाणी ‘नायट्रेट’ने धक्कादायक पातळीपर्यंत सुद्दा गाठली आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील भुजलात ‘नायट्रेट’चे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. तालुक्यातून घेण्यात आलेल्या ३५६ पाणी नमून्यांपैकी ३४० पाणी नमूने ‘नायट्रेट’ने बाधित आढळले आहेत. बार्शीटाकळी तालुक्यात ९७ तर तेल्हारा तालुक्यात ९५ पाणी नमूने ‘नायट्रेट’ने बाधित आढळले आहेत. जिल्हाभर ‘नायट्रेट’बाधित आढळलेल्या ७२९ पाणी नमून्यांमध्ये ४५ मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त ‘नायट्रेट’ आढळल्याने भुजलाने धोकादायक पातळी गाठल्याचे भुजल वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे ‘नायट्रेट’बाधित पाणी गर्भावस्थेत महिलांनी पिल्यास त्यांना होणारे बाळ ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ रोगग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे. 

दरम्यान नायट्रेटबाधित गावांचे सर्व्हेक्षण करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करने आवश्यक आहे.

जिल्ह्यात ‘क्ल्यूरोसिस’ व ‘किडनी स्टोन’चे रोगी
जिल्ह्यातील भुजलात नायट्रेट जास्त प्रमाणात आढळले असले तरी ‘क्षार’ व ‘टीडीएस’युक्त पाण्यामुळे ‘किडनीस्टोन’ रोगग्रस्त जास्त आहेत. काही नागरिकांचा तर किडनीच्या आजारामुळे मृत्यू सुद्धा झाला आहे. भुजलातील पाण्यात ‘क्लोराईड’चे प्रमाण सुद्धा जास्त आढळल्याने पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील काही गावांमध्ये मुखरोगग्रस्त नागरिक अधिक प्रमाणात आढळले आहेत.

नायट्रेटबाधित पाणी प्यायल्याने गर्भवती महिलांपासून होणारे बाळ ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ रोगग्रस्त होते. जिल्ह्यात अद्याप या रोगाने ग्रस्त बाळ आढळले नाही. परंतु ‘क्लोराइड’ व ‘क्षारयुक्त’ पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचे रूग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत.
- एम.एम. राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

Web Title: 'Blue Baby Syndrome' risks due to 'Nitrate' obstruction in Akola