ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलांना गळती

 मेंढला ः ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाची फुले गळून झालेली दशा
मेंढला ः ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाची फुले गळून झालेली दशा

मेंढला (जि.नागपूर) ः नरखेड तालुक्‍यात पिके वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. परंतु अधेमधे होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हाताशी आलेले तुरीचे पीक जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची आशा मावळली आहे.

आता तुरीचे पीक बहरात आले असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. आता तुरीला चांगला बहार आला असताना ढगाळ वातावरणामुळे फुले गळून खाली गळत आहे आणि अळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नाही. किडीचाही प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. नरखेड तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यंदा नरखेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात तूर पिकाची पेरणी झाली आहे. सुरुवातीला जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे आणि आता वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तुरीची फुले गळणे सुरू झाले आहे. पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आदी किडींचाही प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत .

गळत्या फुलांवर उपाय नाही
शेंगा पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने पीक उत्पादनात मोठ्‌या प्रमाणात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. आता ढगाळ वातावरण निवळल्यावर धुके पडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com