वेणाच्या पात्रात बोटिंग सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नागपूर - व्याघ्र राजधानीचे प्रवेशद्वार म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हिंगणा तालुक्‍यातील रायपूर आणि वेणा नदी येथे बोटिंग सुविधेसह पर्यटन विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यासाठी साडेनऊ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील एक कोटीच्या निधीला सरकारने मंजुरी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासावर भर देण्याचे निश्‍चित केले आहे. वन्यजीव अभयारण्य, मंदिरे, किल्ले, तलाव, धरणे आहेत. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटकांना आकर्षित करू शकतील, अशी क्षमता नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमध्ये असल्याने पर्यटकांसाठी योग्य सुविधा निर्माण करणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्यादृष्टीने नागपूरवरून हिंगणामार्गे बोर अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांना रस्त्यात जेवणाचा आणि पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी टुरीझम कॅरीडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

रायपूर आणि वेण्णा नदी येथील पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी प्रत्येकी 4 कोटी 77 लाखांचा निधीला मंजुरी दिली आहे. त्या दोन्ही प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 1 कोटीच्या निधीला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यात फुड कोर्ट, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॅण्डस्केपींग, बोटींग, बोट जेट्टी, जोड रस्ते विकसीत करण्यात येणार आहे. या दोन्ही पर्यटनस्थळांचा मास्टर प्लान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्किटेक्‍चरची नेमणूक करण्यात येणार असून, प्रकल्पाच्या 4 टक्के शुल्क आर्किटेक्‍चरला देण्यात येणार आहे. वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे म्हणाले, पर्यटन विकासाचा आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात 1 कोटीचा निधी मंजूर झाला.

Web Title: boating facility in venna river