esakal | ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आढळला रुग्णाचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आढळला रुग्णाचा मृतदेह

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आढळला रुग्णाचा मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरेड (जि. नागपूर): कुही येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी एका रुग्णाचा मृतदेह आढळून आला. कमलाकर केवलराम दुधपचारे (वय 45, रा. पांडेगाव) असे मृताचे नाव आहे. कमलाकरच्या मृत्यूविषयी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने पत्नी शारदा ही गुरुवारी कमलाकर यास ग्रामीण रुग्णालयात घेऊन आली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर त्यास उपचारासाठी दाखल करून घेतले होते. शुक्रवारी सकाळी सहाला कमलाकरचा मृतदहे रुग्णालयाच्या आवारात आढळून आला. त्याच्या तोंडातून व डोक्‍यातून रक्त निघत होते. याची माहिती पत्नी शारदा हिने रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर कुही पोलिसांना माहिती मिळताच पत्नी शारदा हिने दिलेल्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास कुही पोलिस करीत आहेत. 
दरम्यान, कमलाकर याच्या मृत्यूने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा कुही शहरात केली जात आहे. रात्रपाळीला कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडली असावी, असेही मत व्यक्त केले जात आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी मर्ग दाखल केल्यानेही चर्चांना ऊत आला आहे. 

कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह आवारात आढळतो व पोलिस मर्ग दाखल करतात हे समजण्यापलीकडे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 
-राजू मेश्राम, उमरेड विधानसभाप्रमुख, वंचित बहुजन आघाडी 

loading image
go to top