बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला, घातपाताचा संशय

अनिल कांबळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

नागपूर : शनिवारी घरातून निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा चोवीस तासानंतर सक्‍करदऱ्यातील एका पडक्‍या स्विमींग टॅंकमध्ये मृतदेह आढळला. ही घटना काल (ता.15) दुपारी बारा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

नागपूर : शनिवारी घरातून निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा चोवीस तासानंतर सक्‍करदऱ्यातील एका पडक्‍या स्विमींग टॅंकमध्ये मृतदेह आढळला. ही घटना काल (ता.15) दुपारी बारा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

साहिल वसीम खान (14, रा.वकिल पेठ) असे मृत मुलाचे नाव आहे. शनिवारी (ता.14) सकाळी 12 वाजताच्या सुमारास साहिल हा घरातून निघून
गेला होता. वस्तीत अनेक ठिकाणी भीमजयंतीनिमित्त रॅली असल्यामुळे तो रॅली
बघायला गेल्याचे पालकांना वाटले. त्यामुळे सायंकाळपर्यंत त्यांची घरी परत
येण्याची वाट पाहिली. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत तो घरी न परतल्यामुळे
कुटूंबीयांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी साहिलची शोधाशोध सुरू केली.
त्याच्या मित्रांच्या घरी आणि वस्तीतील नातेवाईकांच्या घरी विचारणा केली.
मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे वडील वसीम खान मोहम्मद यासीन यांनी
इमामवाडा पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल केली.

साहिल हा आठवीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील बांधकाम मजूर आहेत. याप्रकरणी वसीम खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
इमामवाडा पोलिसांनी कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला
होता. आज त्याचे वडील पोलिसांसोबत दुपारी बारा वाजता सक्‍करदरा परीसरातील
एका पडक्‍या स्विमींग टॅंकजवळ साहिलचे कपडे आणि चप्पल दिसली. त्यांनी
कपडे ओळखल्याने त्यांचा जीव धस्स झाला. पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाला
फोन करून माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळावर पोहचले.
त्यांनी मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी
आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: The body of the missing boy was found