कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

कोदामेंढी (जि. नागपूर) : रामटेक खात मार्गावरील इंदोरा शिवारात नाल्याच्या पायलीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. 

कोदामेंढी (जि. नागपूर) : रामटेक खात मार्गावरील इंदोरा शिवारात नाल्याच्या पायलीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुरली रायणी यांच्या शेतात काम करणारे मजूर धानाला फवारणी करीत असताना त्यांना रस्त्याखालील पायलीत मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत लगेच अरोली पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर ह्यासुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी मृतदेह पायलीच्या बाहेर काढून उत्तरीय तपासाकरिता पाठविले. चाळीस ते पंचेचाळीस वयोगातील व्यक्तीचा मृतदेह असून त्याच्या उजव्या हातावर मोराचे चित्र गोंदवलेले आहे. त्याचप्रमाणे उजव्या हातामध्ये काळ्या रंगाचा रबराचा कडा घातलेला आहे. मृताच्या अंगावर कपडे नसून कंबरेखाली केवळ चड्डी घातलेली आहे. मृतदेह नेमका कुणाचा आहे अद्याप पटलेले नसून घातपात आहे की नेमके काय हे उत्तरीय तपासानंतर उघडकीस येईल. यापूर्वी 15 मे रोजी इंदोरा शिवारात घिवरी येथील नाल्यात माजी सैनिकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आज इंदोरा शिवारात मृतदेह आढळून आल्याने शंका कुशंकांना पेव फुटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body was found in a decayed state