बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

तळोधी बा. (जि. चंद्रपूर)  : बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दोघांना तळोधी बा. पोलिसांनी अटक केली. आज, बुधवारी ही कारवाई करण्यात आली. विनोद सहारे आणि आशीष नेरकर अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
वाढोणा येथील काही लोकांकडून पैसे घेऊन बनावट आधार कार्ड तयार करून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विनोद सहारे आणि आशीष नेरकर या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा बनावट आधार कार्ड बनविण्याचा गोरखधंदा समोर आला. त्यामुळे पोलिसांनी झेरॉक्‍स यंत्र, कॉम्प्युटर, लॅमिनेशन मशीन व इतर साहित्य जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विनोद सहारे मूळचा धानोऱ्याचा असून, काही दिवसांपासून त्याचे ब्रह्मपुरीत वास्तव्य आहे. लोकांकडून जुने आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र घेऊन त्याने नवीन आधार कार्ड बनवून देण्याचे काम सुरू केले. या कामासाठी गिरगाव येथील आशीष नेरकर या तरुणाला सोबतीला घेतले. दोघे मिळून काही दिवसांपासून हे काम करीत होते. एवढेच नव्हे, तर ग्राहक शोधण्यासाठी गावागावात प्रतिनिधीही नियुक्त केल्याचे समजते.

Web Title: bogus adhar card news