पैशासाठी खेळाडूने विकली बनावट प्रमाणपत्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - अल्पावधीत पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी एका खेळाडूने चक्‍क क्रीडा उपसंचालकांची बनावट सही व शिक्‍का असलेले नकली प्रमाणपत्र अनेक युवकांना विकल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी चौकशीसाठी त्या खेळाडूस ताब्यात घेतले.

सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना पाच टक्‍के आरक्षण देण्यात येते. त्यासाठी खेळातील प्रावीण्य किंवा सहभागाचे प्रमाणपत्र आवश्‍यक असते. या संधीचा फायदा घेत चंद्रपूरचा हॅंडबॉलपटू मोसिम शेख याने बनावट पडताळणी प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र त्याने नोकरी इच्छुक युवकांना प्रत्येकी 50 हजारांमध्ये विकले. त्याने 15 ते 20 जणांना हे प्रमाणपत्र विकल्याची प्राथमिक माहिती आहे. मोसिमकडून विकत घेतलेले बनावट प्रमाणपत्र काही दिवसांपूर्वी पडताळणीसाठी विभागीय क्रीडा संचालक कार्यालयात आले असता कार्यालयातील महेश पडोळे नावाच्या कर्मचाऱ्याला त्याबद्दल शंका आली. त्यांनी प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले. त्याने प्रमाणपत्र तयार करताना क्रीडा उपसंचालकांची हुबेहूब स्वाक्षरी व स्टॅम्प वापरले आहेत. आपण हे सर्व पैसे कमाविण्यासाठी केले असून, प्रमाणपत्र विकलेल्या युवकांपैकी बहुतांश मित्रच असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: bogus document crime