तरुणाईने अनुभवला बोकवा फिटनेस डान्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

नागपूर - बोकवा साउथ आफ्रिकेतील फिटनेस डान्सचा प्रकार असून, तो अलीकडे नागपुरातील तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. फिट राहण्यासाठी या डान्स प्रकाराची मदत होत असल्याने सर्वच वयोगटांतील महिला व पुरुषांना त्याने वेड लावले. याच फिटनेस डान्स व मनोरंजनाची अनोखी भेट बोकवा फिटनेस डान्स प्रशिक्षणाच्या माध्यमातून सकाळ मधुरांगण आणि सिलॅट्रो फाइन डायनिंगने उपलब्ध करून दिली. तरुणाईने यात सहभागी होत डान्सचा आनंद लुटला.

सिंगापूर येथील बोकवातज्ज्ञ हेमा अंकराजू, चेन्नई येथील प्रभुराम आणि नागपूरच्या बोकवा ऍम्बेसिडर स्वाती डोंगरे, राखी डांगे व ऋतुजा घोरपडे यांनी रविवारी खामला चौकातील विजश्री पराते सभागृहात तरुणाईला बोकवा फिटनेस डान्सचे प्रशिक्षण दिले. या वेळी सिलॅट्रो फाइन डायनिंगच्या संचालिका लीना मुडे, शैलजा गिरडकर व बोकवाचे इव्हेंट व्यवस्थापक तुषार कोटा उपस्थित होते. टॉलीवूड मसाला या साउथच्या गाण्यावर डान्स करून तरुणाईला वजन कमी करण्याचे प्रशिक्षण दिले. बोकवा ऍरोबिकचा सुधारित प्रकार असून, पॉल मावी त्याचे संचालक आहेत. 

बोकवा नृत्याच्या कुठल्या प्रकाराने शरीरातील कॅलरीज घटविता येतात, याची माहिती डान्सच्या प्रात्यक्षिकासह दिली. टॉलीवूड मसालामध्ये साउथ इंडियन म्युझिक विथ तडकाबाबत नागपूरकरांना ओळख करून दिली. तरुणाईने बोकवा व टॉलीवूड मसाला या फिटनेस डान्सवर थिरकत त्यांचा आनंद लुटला. सकाळ मधुरांगण व सिलॅट्रो फाइन डायनिंगने हे प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाला डोंगरे ऍरोबिक्‍स सेंटरचे सहकार्य लाभले.
 
बोकवा फिटनेस डान्स आनंद व मनोरंजनाशी निगडित आहे. सकाळ मधुरांगणचा हा उपक्रम म्हणजे आरोग्याप्रती जनजागृतीचा उपक्रम होय.
- लीना मुडे, संचालिका सिलॅट्रो फाइन डायनिंगन.
 
वेट लॉस आणि मनोरंजानातून नृत्याचा बोकवा डान्स प्रकार आरोग्यदायी आहे. सकाळ मधुरांगणने या प्रशिक्षणाचे आयोजन करून नागपूरकरांना अनोखी भेट दिली.
- शैलजा गिरडकर, संचालिका सिलॅट्रो फाइन डायनिंगन
 
फिटनेससाठी बोकवाची मदत होते. व्यस्त कामातून अर्धा तास बोकवा डान्स करून तंदुरुस्त राहता येत असल्याने याकडे तरुणाईसह सर्वच वयोगटातील महिला व पुरुष आकर्षित होताहेत.
- स्वाती डोंगरे, संचालिका डोंगरे ऍरोबिक्‍स सेंटर

Web Title: Bokava experienced by youth dance fitness