बोंडअळीच्या मदतीपासून पाच तालुके वंचित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - बोंडअळीच्या नुकसानासाठी मदत निधी देण्यात आला असून, नागपूर  जिल्ह्याला ६८ कोटी ५७ लाखांचा निधी मिळाला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सर्व १३ ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार असून त्यासाठी सुधारित आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, हा निधी फक्त ८ तालुक्‍यांसाठी देण्यात आला असून पाच तालुक्‍यांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी शब्द फिरवला, अशीच टीका होत आहे. 

बीटी कापसावर मागील खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापला. त्यानंतर शासनाने मदत देण्याचे जाहीर केले होते. शासन, पीकविमा आणि बियाणे कंपनी अशी त्रिस्तरीय मदत देण्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी सभागृहात केली होती. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्‍टरी ६ हजार ८०० तर बागायती शेतीसाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. कृषी व महसूल यंत्रणेकडून संयुक्त सर्वेक्षणही करण्यात आले.

यात नागपूर जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत ३३ टक्‍क्‍यांपेक्षा नुकसान दाखविण्यात आले. मात्र मौदा, काटोल, नरखेड, रामटेक आणि कळमेश्‍वर या पाच तालुक्‍यांत नुकसान झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. या अहवालावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यानंतर खरीप हंगामच्या आढावा बैठकीसाठी आलेले कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सर्व १३ ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. शासनाकडून मदत निधी आदेश काढण्यात आला आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार आठ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Bond Worm Help Fund 5 Tahsil