61 वर्षांच्या वृद्धावर बोन मॅरो प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः वय वर्षे 61. नाव रमेश...2017 मध्ये रक्ताचा कर्करोग (मल्टिपल मायलोमा) असल्याचे निदान झाले. दोन वर्षे त्याच्यावरचे उपचारही पूर्ण झाले. पण हा आजार आटोक्‍यात आला नाही. त्यांच्या या आजारावर बोन मॅरो प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. अखेर बोन मॅरो प्रत्यारोपणातून त्याचा जीव वाचवण्यात आला. येथील अमेरिकन ऑन्कोलॉजी संस्थेत ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या रमेश ठणठणीत आहे.

नागपूर ः वय वर्षे 61. नाव रमेश...2017 मध्ये रक्ताचा कर्करोग (मल्टिपल मायलोमा) असल्याचे निदान झाले. दोन वर्षे त्याच्यावरचे उपचारही पूर्ण झाले. पण हा आजार आटोक्‍यात आला नाही. त्यांच्या या आजारावर बोन मॅरो प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. अखेर बोन मॅरो प्रत्यारोपणातून त्याचा जीव वाचवण्यात आला. येथील अमेरिकन ऑन्कोलॉजी संस्थेत ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या रमेश ठणठणीत आहे.

मूळचा मध्य प्रदेशातील रमेश. 2017 मध्ये यांना मल्टिपल मायलोमा या आजाराचे निदान झाले. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्‍त कमी होते. प्लेटलेट्‌सच्या संख्येत झपाट्याने घट होते. हाडे दुर्बल होतात. शरीरातील अनैसर्गिकपणे प्रोटीन
अर्थात प्रथिनांच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होते. साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत असल्याचे हिमॅटो ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. ए. के. गंजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, उपचाराच्या विविध टप्प्यांवर काम करून, मायलोमावर ऑटोलॉगस बोन मॅरोच्या प्रत्यारोपणातून हा आजार समूळ नष्ट करता येतो. एखाद्या संगणकाला फॉर्मेट करून त्यात नवीन ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासारखे आहे. तीन भागांत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाच्या रक्‍तातून ऍफरसीसच्या मदतीने मूळ पेशी काढण्यात आल्या. यानंतर शरिरातील रक्‍त एका अत्याधुनिक मशीनमध्ये टाकले. कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय रक्‍तातून मूळ पेशी वेगळ्या केल्या. उर्वरित रक्‍त पुन्हा रुग्णाच्या शरिरात परत टाकण्यात आले. पुरेशा मूळ पेशींचा साठा झाल्यानंतर केमोथेरपीचा डोस दिला. या प्रक्रियेद्वारे शरिरात लपलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या. किमोची तीव्रता जास्त असल्यामुळे नैसर्गिक बोन मॅरोही नष्ट होतो. रुग्णाच्या शरिरात प्रवाहित करण्यात आलेल्या निरोगी आणि सुदृढ मूळ पेशी कार्यप्रवण होऊन त्यांची पुनर्मिती होण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रख्यात हिमॅटो ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. ए. के. गंजू यांच्या नेतृत्वात बोन मॅरोची शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. गंजू यांच्यासह डॉ. नरेश जाधव, डॉ. निखिल पांडे (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ. राणी लाखे (इन्टेनसिव्हीस्ट), डॉ. हरीश वरभे (पॅथोलॉजिस्ट) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पत्रकार परिषदेत डॉ. सुनील सहस्त्रबुद्धे, महेश बाबू उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bone marrow transplant at 61 years of age