वाढलेले तापमान मेट्रोसाठी वरदान

नागपूर: मेट्रो भवनच्या प्रशस्त इमारतीवर लावलेले सोलर पॅनेल.
नागपूर: मेट्रो भवनच्या प्रशस्त इमारतीवर लावलेले सोलर पॅनेल.

नागपूर:  शहरातील वाढलेले तापमान नागपूरकरांसाठी त्रासदायक ठरले असले तरी महामेट्रोसाठी वरदान ठरले. वाढलेल्या तापमानाचा लाभ घेत महामेट्रोने केवळ मे महिन्यात एक लाख चार हजार 307 युनिट वीजनिर्मिती केली. महामेट्रोने खापरी, न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट साउथ, एयरपोर्ट या चार स्टेशनसह दीक्षाभूमीजवळील मेट्रो भवनवर 2,342 सोलर पॅनेल लावले आहेत.
यंदा नागपूरकरांना उन्हाचे चांगलेच चटके सहन करावे लागले. अनेकांनी दुपारी घराबाहेर निघणेही बंद केले. मात्र, महामेट्रोने प्रत्येक स्टेशनवर लावलेल्या सोलर पॅनेलद्वारे विजेती निर्मिती केली. त्यामुळे भविष्यात सौरऊर्जेच्या निर्मितीत आणखी भर पडणार आहे. या विजेचा वापर मेट्रो चालविण्यासह स्टेशन प्रकाशाने उजळण्यासाठी करण्यात येत आहे. मेट्रोसाठी लागणाऱ्या एकूण विजेपैकी 65 टक्के विजेची गरज सौरऊर्जेतून भागविण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रो रेल्वे स्थानक, फलाट आणि इमारतींचाही वापर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com