पावसाचे पाणी शिरले पाईपमध्ये अन्‌ बाहेर आले हे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

पिल्लाचा आवाज ऐकताच जंगलाच्या दिशेने अस्वल धावत पिल्लाकडे आले. तिने दोन्ही हाताने पिल्लाला उचलून प्रेमाने चाटायला सुरुवात केली. पिल्लूसुद्धा आपल्या आईला भेटून आनंदाने ओरडू लागला. मायलेकांच्या वात्सल्याचे क्षण बघून वनाधिकारी व चमूसुद्धा भावुक झाले होते. पिल्लाला गोंजारून अस्वलाने पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली. 

भंडारा : वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सीतेपार येथे कालव्याच्या पाईपमध्ये अस्वलाने गुरुवारी (ता. 2) सकाळी पिल्लाला जन्म दिला. परंतु, पावसाचे पाणी शिरल्याने अस्वल नसताना पिल्लू बाहेर पडले. त्यामुळे लोकांनी एकच गर्दी केली. यामुळे परतलेल्या अस्वल बिथरले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पिल्लाला ताब्यात घेत उपचार करून सायंकाळी सुरक्षितपणे जंगलात सोडले.

हेही वाचा - मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...

भंडारा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सीतेपार येथे रस्त्यालगत शेतातील कालव्याच्या पाईपमध्ये अस्वलाने पिलाल्ला जन्म दिला. दरम्यान पावसामुळे कालव्यात पाणी साचल्याने अस्वल सोबत नसताना अस्वलाचे पिल्लू पाइपच्या बाहेर पडले. पिल्लू दिसताच लोकांनी तिथे गर्दी केली. याचवेळी परत आलेले अस्वल गुरकावत लोकांच्या अंगावर धावून गेले. लोकांनी आरडाओरड केल्यामुळे पिल्लाला तिथेच सोडून अस्वल जंगलाच्या दिशेने पळाले.

No photo description available.

याबाबत भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले. आजूबाजूला तपासणी केली. परंतु, तिथे अस्वल नव्हते. पावसात ओले झाल्यामुळे अस्वलाचे पिल्लू थंडीने कुडकुडत होता. त्याला भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयात नेऊन उबदार कपड्यात ठेवण्यात आले. बाटलीच्या साहाय्याने दूध पाजल्यानंतर भुकेजलेले पिल्लू शांत झाले. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

पिल्लाची अस्वलाकडे धाव

सायंकाळी अस्वलाच्या पिल्लाला ज्या ठिकाणावरून उचलले त्याच ठिकाणावर परत सोडण्यासाठी चमू पोहोचली. पिल्लाला ठेवून सुरक्षित अंतरावरून वनाधिकारी व चमू नजर ठेवून होते. पिल्लाचा आवाज ऐकताच जंगलाच्या दिशेने अस्वल धावत पिल्लाकडे आले. तिने दोन्ही हाताने पिल्लाला उचलून प्रेमाने चाटायला सुरुवात केली. पिल्लूसुद्धा आपल्या आईला भेटून आनंदाने ओरडू लागला. मायलेकांच्या वात्सल्याचे क्षण बघून वनाधिकारी व चमूसुद्धा भावुक झाले होते. पिल्लाला गोंजारून अस्वलाने पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली. दुरावलेल्या माय लेकांचे भेट घडवून दिल्याचे समाधान घेऊन वनविभागाची चमू मार्गस्थ झाली. 

Image may contain: 1 person, standing and beard
अस्वलाच्या पिल्लाला सोडताना वनविभागाची चमू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Born a bear in bhandara